शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

शेती गेली, घर गेले अन् पुनर्वसनात गैरप्रकार झाले

By admin | Updated: August 29, 2015 02:39 IST

गत ३२ वर्षांपूर्वी बेंबळा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. आज हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. मात्र वितरिका शेतापर्यंत पोहचल्या नाही.

मुख्यमंत्र्यांपुढे प्रकल्पग्रस्तांनी मांडल्या व्यथा : ३५ निवेदने सादर, तीन तासानंतर केवळ मुख्यमंत्रीच बोललेआरीफ अली  डेहणी (बाभूळगाव)गत ३२ वर्षांपूर्वी बेंबळा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. आज हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. मात्र वितरिका शेतापर्यंत पोहचल्या नाही. या प्रकल्पामध्ये ज्या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनाच्या कामात मोठा गैरप्रकार झाला, असा आरोप ग्रामस्थांनी केला. न्यायासाठी त्यांनी आपले प्रश्न थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी मांडण्यासाठी डेहणी प्रकल्प कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. तीन तास प्रतीक्षा केल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांपुढे आपले प्रश्न मांडता आले नाही. यावेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे ३५ निवेदने सोपविली. बेंबळा प्रकल्प १० हजार हेक्टर क्षेत्रात विस्तारला आहे. २४ गावे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येतात. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, त्या गावांना अद्यापही महसुली दर्जा मिळाला नाही. या ठिकाणी पुरविण्यात आलेल्या १८ सुविधांमध्ये मोठा गैरप्रकार झाला आहे. निकृष्ट कामामुळे रस्त्याला तडे गेले आहेत. नाल्या खचल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. खांब वाकले आहेत. पूर्ण वेळ वीज मिळत नाही. यातून कृषी सिंचनही रखडले आहे. यासह अनेक प्रश्न घेऊन ग्रामस्थ प्रकल्पस्थळी पोहोचले होते. वडिलोपार्जित जमीन गेली. कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. मुलांचे शिक्षण थांबले आहे. यातून मार्ग काढायचा कसा, हा प्रश्न प्रकल्पग्रस्तांपुढे आहे. मात्र, सरकार संवेदनशील नसल्याने अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या. या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपले प्रश्न निवेदनाच्या रूपात मांडले. मुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधतील म्हणून डेहणी, दाभा पहूर, कोल्ही, बारड, कोपरा, कोठा, अलीपूर, खडकसावंगा, भटमारक, दिघी १, चोंढी फाटा, कोपरा जानकर, पिंपळखुटा या गावांतील प्रकल्पग्रस्तांनी डेहणी गावामध्ये हजेरी लावली होती. प्रत्येकाने प्रश्न विचारण्याची तयारी चालविली होती. मात्र, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर कार्यक्रमच संपविण्यात आला. त्यामुळे इतर प्रकल्पग्रस्तांना प्रश्नच मांडता आले नाही. गोसेखुर्दच्या धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा, डेहणी प्रकल्पाचे १८ झोन सुरू करण्यात यावे, मुख्य कालवा वितरिकांचे काम पूर्ण करावे, घराचा आणि शेतीचा तत्काळ मोबदला मिळावा, पुनर्वसित गावांना महसुली दर्जा मिळावा. तेथील प्राथमिक सुविधा प्रकरणांची चौकशी करावी यासह विविध प्रश्न घेऊन प्रकल्पग्रस्त आले होते. दरम्यान, मुख्य कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर लक्ष ठेवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. शासनाने सुरू केलेला जलयुक्त शिवार उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातून शाश्वत सिंचन होणार आहे. शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, असे पालकमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांशी बोलताना सांगितले.