शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:54 IST

धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देसरकारविरुद्ध घोषणाबाजी : अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.धनगर समाज संघर्ष समितीच्या पुढाकाराने यवतमाळात हे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या गेल्या काही वर्षातील सततच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्य सरकारने काही निर्णय घेतले. मात्र धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीकडे कायमच सरकारने दुर्लक्ष केले. निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला दिलेला शब्द सरकारने पाळला नाही. त्यामुळे शनिवारी समाजबांधवांनी यवतमाळात आपला आक्रोश व्यक्त केला.स्थानिक तिरंगा चौकात धनगर समाज बांधव एकवटले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे मोर्चाच्या अग्रस्थानी महिलाच होत्या. सरकारने शब्द पाळला नाही, अशा घोषणा देत धनगर बांधवांनी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र संताप नोंदविला. सरकारने शब्द पाळावा अन्यथा चालते व्हावे, असे म्हणत धनगर बांधवांनी रोष नोंदविला.यावेळी खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पांडुरंग खांदवे, श्रीधर मोहोड, डॉ.संदीप धवने, संजय पाटील शिंदे, डॉ.रमेश महानूर, डॉ.प्रियंका धवने, अविनाश जानकर, उमेश अवघड, दिलीप पुनसे, प्रफुल्ल लोखंडे, गजानन मासोळे, राजेश गायनार, कैलास शिंदे आदी सहभागी झाले होते.निवडणुकीच्या तोंडावर सरकारला इशारा२०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपाने धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता २०१९ च्या निवडणुकीपूर्वी मोर्चाद्वारे समाजाने सरकारला इशारा दिला आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा