शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडकी पोलिसांविरूद्ध ‘एसपीं’कडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:02 IST

वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.

ठळक मुद्देविवाहितेचा खून : पती शरण, मात्र इतरांवरही कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे सर्व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांसह, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.राळेगाव तालुक्यातील खैरी येथे २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ज्योती विनोद धोटे या विवाहितेचा खून झाला. घरातील सर्वांनी संगनमत करूनच हा खून केल्याचा आरोप मृताचा भाऊ सतीश पुंजाराम जोगी रा. कुंभा ता. मारेगाव यांनी केला आहे. घटनेनंतर मृताच्या पतीने स्वत:च पोलिसात आत्मसमर्पण केले. मात्र त्यानंतर इतर आरोपींवर कारवाई करण्याची तसदी वडकी पोलिसांनी घेतली नाही. पतीचे अनैतिक संबंध आणि हुंड्याच्या हव्यासापोटीच हा खून झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी खुनातील इतर आरोपींबाबत तपासात चालढकल करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे ज्योती विनोद धोटे हिच्या खुनात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी व तिच्या लहान मुलींना न्याय देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.निवेदन देतेवेळी मृताचा भाऊ सतीश जोगी, आई कांचन जोगी, राळेगाव शिवसेना तालुका प्रमुख मनोज भोयर, महिला आघाडी प्रमुख वर्षा मोघे, स्वाती बहादुरे, सुनिल बहादुरे, मंदा मुडे, गिरजा शेंडे, विरेंद्र मोघे, रामेश्वर पांगूळ, पल्लवी जवादे, जया निवल, अर्चना जनुजवार, कविता वासेकर, कल्पना वाटगुळे आदी नातेवाईक उपस्थित होते.