शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: December 30, 2015 02:54 IST

नगरपरिषदेने दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी प्रारंभ केला. आझाद मैदानातून मोहीम उघडण्यात आली.

आझाद मैदानातून प्रारंभ : जिल्हा कचेरीचा विळखा काढलायवतमाळ : नगरपरिषदेने दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी प्रारंभ केला. आझाद मैदानातून मोहीम उघडण्यात आली. रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविल्यानंतरच ही मोहीम संपणार आहे.काही महिन्यांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदेने मुुख्य मार्गासह अनेक ठिकाणचे अतिक्रमण काढले होते. यानंतर ही मोहीम थांबली होती. दुसऱ्या टप्प्यात शहरातील रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येणार होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरपरिषदेने अहवाल सादर केला व अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातीलही अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले.ही मोहीम अखंड सुरू राहणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. सकाळी ८ वाजतापासून ही मोहीम आझाद मैदानातून सुुरू करण्यात आली. आझाद मैदानाला अतिक्रमणाचा वेढा बसला होता. या ठिकाणची ५० अतिक्रमणे काढण्यात आली. ठेले बुल्डोझरच्या मदतीने उलथविण्यात आले, तर चिवडा विक्रेत्यांच्या मार्गावरील संपूर्ण रस्ता खुला करण्यात आला. यानंतर अतिक्रमण हटाव मोहीम जुन्या मार्केटमधील टांगा चौकात शिरली. या ठिकाणी असलेल्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यात आले, तर दुुकानाचे छत रस्त्यावर आलेल्या विक्रेत्यांना छत काढण्याच्या सूचना यावेळी नव्याने पथकाने दिल्या. यामुळे या भागात पहाटेपासून लगबग पाहायाला मिळाली. हटविलेली दुकाने उचलून नेण्यासाठी मोठा ताफा होता. जे विक्रेते हजर नव्हते, त्यांचे ठेले नगरपरिषदेने अतिक्रमण ठिकाणावरून काढून नेले. ही मोहीम पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुुप खांडे, नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांची चमू उपस्थित होती. कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा ताफा, वाहने आणि दुकाने हटविण्यासाठी बुल्डोझर सोबत होता. बुधवारी ही मोहीम शहरातील विविध भागात शिरणार आहे. बुल्डोझरच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्याची व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. अतिक्रमणे हटवून पार्किंगकरिता पट्टे आखले जाणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. (शहर वार्ताहर) जनहित याचिका आणि आझाद मैदानआझाद मैदानातील अतिक्रमणाबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. विकासकामाच्या नावाखाली या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला. त्यापूर्वी नगरपरिषदेने आझाद मैदानात कुठलेही कार्यक्रम घेणार नाही, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. मात्र, यानंतरही कार्यक्रमाला जागा दिली गेली. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या ठिकाणचा निकाल लागायचा आहे. याबाबतचा न्यायालयातील दस्ताऐवज अ‍ॅड. जयसिंग चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दाखविला. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी वकिलाच्या सल्ल्यानंतर आझाद मैदानातील मोहीम होणार असल्यास स्पष्ट केले.