शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांतून श्रीमंत बाद

By admin | Updated: June 17, 2017 01:10 IST

बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला

 शासनाचा निर्णय : निव्वळ शेतकऱ्यांना मिळणार लाभ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या मदतीतून प्रतिष्ठित शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. निव्वळ शेतीवर उपजीविका असलेल्यांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. ३१ आॅक्टोबरपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. परंतु खरीप हंगाम सुरू झाला असताना ३१ आॅक्टोबरच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने शासनाने तातडीने दहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दहा हजाराच्या या रकमेतून आजी-माजी लोकप्रतिनिधी, शासकीय नोकर आदी प्रतिष्ठितांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता निव्वळ शेतकरी असलेल्यांनाच दहा हजाराच्या या मदतीचा लाभ मिळणार आहे. प्रतिष्ठितांना वगळण्याचा हा निर्णय केवळ दहा हजाराच्या मदतीसाठी लागू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो ३१ आॅक्टोबरपर्यंत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीलाही लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दहा हजाराची ही रक्कम नवे कर्ज देताना त्यातून कपात केली जाणार आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विचार केल्यास प्रतिष्ठितांच्या वगळण्यामुळे दहा टक्के लाभार्थी कमी होणार आहेत. कारण बडे शासकीय नोकर, व्यापारी, व्यावसायिक, शाळा-महाविद्यालये यांचे बँक खाते सहसा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये राहते. त्यांचा जिल्हा सहकारी बँकेशी फारसा संबंध येत नाही. परंतु राष्ट्रीयकृत बँकांमधील २५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिष्ठित लाभार्थी या दहा हजाराच्या माफीतून वगळले जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेला हवे सव्वाशे कोटी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे एक लाख ४० हजार निव्वळ शेतकऱ्यांना दहा हजाराच्या मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. आजच्या स्थितीत एवढी आर्थिक तरतूद जिल्हा बँकेकडे नाही. त्यामुळे यावर निर्णय घेण्यासाठी २१ जूनला जिल्हा बँक संचालक मंडळाची बैठक होत आहे. त्यात निर्णय घेवून बँकेची आर्थिक परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजाराची रक्कम वाटण्याइतपत भक्कम नसल्याचे शासनाला कळविले जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील या श्रीमंत शेतकऱ्यांना मदतीतून वगळले आजी-माजी खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती यांचे सदस्य, शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्यावर चालणाऱ्या संस्था, प्राप्तीकर भरणारे सर्व सदस्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, जिल्हा परिषद, नगर पालिका येथील नोंदणीकृत कंत्राटदार, सेवाकरासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या व्यक्ती, शॉप अ‍ॅक्ट परवाना असलेले दुकानदार, चारचाकी वाहनांच्या मालकीची नोंद असलेले व्यक्ती आदी प्रतिष्ठितांना दहा हजाराच्या मदतीतून वगळण्यात आल्याचे जिल्हा सहकारी बँकेच्या सुत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.