शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तपानंतरही घरकुलापासून वंचित

By admin | Updated: July 9, 2017 00:53 IST

१२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही.

वृद्ध अंजनाबाईची खंत : धावंडा नदीच्या पूर प्रलयाला १२ वर्षे पूर्ण लोकमत न्यूज नेटवर्क दिग्रस : १२ वर्षांपूर्वी धावंडा नदीच्या पुरात सर्वस्व गमावलेल्या अंजनाबाईला एक तपानंतरही हक्काचे घरकूल मिळाले नाही. परिणामी प्रलयातून जिवंत राहणे हे सुदैव नसून मोठे दुर्दैव ठरल्याची खंत ८६ वर्षीय अंजनाबाई सोनोने यांनी व्यक्त केली. १२ वर्षांपूर्वी ९ जुलै रोजी धावंडा नदीला महापूर आला. या पुरात संजय पांडुरंग सोनोने, त्यांची पत्नी मीना, मुलगी भाग्यश्री व तेजस्विनी व मुलगा वैभव, असे पाच जण वाहून गेले. याशिवाय शशिकला नवरे, वासुदेव नवरे, शांता शिंदे, बाली शिंदे, श्याम पाचंगे, दिवाकर शेलकर, पंचीबाई राठोड, प्रभाकर विलायते व स्वाती विलायते हेसुद्धा पुरात वाहून गेले होते. पुसद मार्गावरील नांदगव्हाण धरणाचा सांडवा अचानक फुटल्याने धावंडा नदीची पाणी पातळी वाढून हा महापूर आला होता. त्यात सोनोने कुटुंबातील पाच जणांसह १२ जणांचे निष्पाप बळी गेले. या महापुरातून अंजनाबाई बचावल्या होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत पुराने मुलगा, सून व तीन नातवंडांना गिळंकृत केले होते. त्यांचे घरही जमीनदोस्त झाले होते. पुरानंतर शासन, विविध सामाजिक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी मलमपट्टी केली. मात्र त्यापैकी अनेकांना अद्यापही हक्काचे घरकूल मिळू शकले नाही. अंजनाबाईही अंध मुलीसह एका झोपडीत वास्तव करून आहे. मोडक्या झोपड्यांमध्ये संसार पूरग्रस्तांनी धावंडा नदीकाठी मोडक्या झोपड्यात संसार थाटला. या परिसरात झाडेझुडपे वाढली असून सांडपाणी साचले आहे. विजेची सुविधा नाही. त्यामुळे रात्री किर्र.. अंधार असतो. या परिसरात कोणत्याच नागरी सुविधा नाही. वयोवृद्ध अंजनाबाई सोनोने आपल्या अंध अविवाहित मुलीसह याच परिसरात झोपडीमध्ये वास्तव्याला आहे. डोळे मिटण्यापूर्वी घरकूल मिळेल का, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.