शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज माघारीनंतरच होणार चित्र स्पष्ट

By admin | Updated: February 4, 2017 01:07 IST

काही पक्षांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म बहाल केल्याने अशा ठिकाणी त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे ७ फेब्रुवारीला कळणार आहे.

जिल्हा परिषद : एबी फॉर्मच्या गोंधळामुळे त्रेधातिरपट, ७ फेब्रुवारीपर्यंत माघारीची मुदत यवतमाळ : काही पक्षांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म बहाल केल्याने अशा ठिकाणी त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण, हे ७ फेब्रुवारीला कळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारांच्या माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि पंचायत समितींच्या ११० गणांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना अंतिम क्षणापर्यंत यादीत बदल केले. यात काहींना पूर्वीच एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ उडाला. काहींना ऐनवेळेवर पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळे एकाच गट व गणात काही पक्षाच्या दोन उमेदवारांनी नामांकन अर्जासोबत एबी फॉर्म जोडल्याचे दिसून आले. यात त्या पक्षाचा नेमका अधिकृत उमेदवार कोण, हे कळेनासे झाले आहे. भाजपाने पांढरकवडा तालुक्यातील एका गटासाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले. काँग्रेसनेही बाभूळगाव तालुक्यात दोघांना एबी फॉर्म दिले. शिवसेनेने ऐनवेळी आधीचे उमेदवार बदलवून दुसऱ्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिले. राष्ट्रवादीतही अंतिम क्षणापर्यंत पुसद, महागाव, उमरखेड तालुक्यात एबी फॉर्म वाटपावरून गोंधळ उडाला होता. यामुळे पक्षांचे उमेदवार कोण, हे कळेनासे झाले होते. तथापि बहुतांश ठिकाणी एकच एबी फॉर्म असल्याने तेथील उमेदवारी निश्चित आहे. तूर्तास भाजपाचे ५५, शिवसेनेचे ५४, काँग्रेसचे ५१, तर राष्ट्रवादीच्या ४२ उमेदवारांसह ५५ जागांसाठी एकूण ५२६ उमेदवार रिंगणात कायम आहेत. (शहर प्रतिनिधी)