शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी परतफेड थांबविली

By admin | Updated: June 15, 2017 00:58 IST

कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे.

नवीन कर्जासाठी गर्दी : ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी फेडले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे. नवीन कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे एकच गर्दी केली आहे. मात्र आदेशच नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. पेरणीपूर्वी काही प्रमाणात शेतकरी कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांकडे जात होते. मध्यंतरी कर्जमाफीची घोषणा झाली. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची प्रक्रिया थांबविली आहे. नव्याने कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे धाव घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. दररोज शेकडो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ बँक कर्मचाऱ्यांवर ओढविली आहे. नवीन कर्जाचा तिढा शासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र या संदर्भात अद्यापही बँकांना अधिकृत आदेश पोहोचले नाही. तसेच तातडीने दहा हजार रुपये कर्ज देण्यासंदर्भातही कोणतेही आदेश नाही. त्यामुळे नवीन कर्जाचा तिढा निर्माण झाल्याने पेरणीचे संकट ओढवले आहे.