शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘झेडपी’ सभापती पायउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:57 IST

येथील जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर पारित झालेल्या अविश्वास ठरावाला त्या सभापतींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत स्थगनादेश दिला होता. मात्र सोमवारी शिवसेना गटनेत्याच्या याचिकेवरून हा स्थगनादेश उठविण्यात आल्याने दोन्ही सभापती अखेर पायउतार झाले आहे.

ठळक मुद्देस्थगनादेश उठविला : शिवसेना गटनेत्याने दाखल केली होती याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींवर पारित झालेल्या अविश्वास ठरावाला त्या सभापतींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून न्यायालयाने त्यांना १२ जूनपर्यंत स्थगनादेश दिला होता. मात्र सोमवारी शिवसेना गटनेत्याच्या याचिकेवरून हा स्थगनादेश उठविण्यात आल्याने दोन्ही सभापती अखेर पायउतार झाले आहे.जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्यावर ३ मे रोजी आयोजित विशेष सभेत अविश्वास ठराव पारित झाला होता. या ठरावाला दोन्ही सभापतींनी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यातून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेत अविश्वास ठरावाची नोटीस बजावली नाही, असा आक्षेप घेतला होता. त्यावरून उच्च न्यायालयाने अविश्वास ठरावाला स्थगनादेश दिला होता. त्यामुळे मानकर आणि दरणे हे दोन्ही सभापती आपआपल्या पदावर कायम होते. स्थगनादेशामुळे त्यांनी स्थायी समितीसह इतरही कामकाजात सहभाग घेतला होता.या स्थगनादेशानंतर शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने सोमवारी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तीवाद केला. मोहोड यांच्या वकिलाने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेतच नोटीसवर स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास आणून दिले.तसेच तब्बल ५९ सदस्यांनी मानकर यांच्याविरुद्ध अविश्वास दर्शविला आहे, हीबाबही प्रकर्षाने मांडली. त्यावरून न्यायालयाने दोन्ही सभापतींच्या पदावरील स्थगनादेश हटविला, अशी माहिती श्रीधर मोहोड यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या राजकारणात उलथापालथलोकसभा निवडणुकीमुळे अविश्वास ठराव आणला गेला होता. शिवसेना आणि भाजपने यापुढे युती करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्ष मिळून सत्तेत आहे. आता शिवसेना-भाजपने युतीचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अविश्वास ठरावाला समर्थन देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य पुढील काळात सत्तेबाहेर राहण्याची चिन्हे दिसत आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेची युती कायम राहील काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.नवीन पदाधिकारी ठरणार औटघटकेचेउच्च न्यायालयाने स्थगनादेश हटविल्याने नवीन दोन सभापतींची निवड केली जाईल. तत्पूर्वी त्या सभापतींना सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करण्याचीही संधी आहे. मात्र नवीन निवड झाल्यास दोन्ही सभापती औटघटकेचे ठरणार आहे. येत्या आॅक्टोबरमध्ये जुन्या पदाधिकाºयांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे नव्या पदाधिकाºयांना केवळ तीनच महिने संधीची शक्यता आहे.