शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

अखेर आर्णीचा गजानन डॉक्टर होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 21:41 IST

सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता.

ठळक मुद्देसमाज धावला मदतीसाठी : उमरखेड, पुसद, महागाव, फुलसावंगीतून हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : सामान्य सलून चालकाचा मुलगा डॉक्टरकी शिकण्यासाठी नागपुरात पोहोचला. मात्र आर्थिकस्थिती नसल्याने आणि मानसिक नैराश्य आल्याने तो शिक्षण सोडून गावी परत आला होता. त्याची व्यथा ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर समाज मदतीसाठी धावला आणि हजारोंची आर्थिक मदत करण्यासोबतच मानसिक दिलासा देत त्याला पुन्हा डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी सज्ज केले.गजानन मनोज भुजाडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील मनोज भुजाडे भाडेतत्त्वावरील सलूनच्या दुकानात काम करीत होते. मोठ्या हिमतीने त्यांनी मुलाला नागपूर येथे दंतचिकित्सक अभ्यासक्रमासाठी पाठविले. त्यासाठी घर गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र इकडे भाड्याचे दुकान दुसऱ्या मालकाने घेतल्याने गजाननच्या वडिलांचा व्यवसायही बंद झाला. त्यातूनच निराश झालेला गजानन शिक्षण सोडून गावाकडे परत आला. ही बाब ‘लोकमत’ने ११ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केली. त्यानंतर काही नागरिकांनी व्हॉटस्अ‍ॅपवर आवाहन करून मदत गोळा केली. त्यात तब्बल ३६ हजार ७५० रुपये गोळा झाले. उमरखेड येथून सात हजार ९००, पुसद, महागाव येथून दहा हजार ७५० तर फुलसावंगी परिसरातून १८ हजार १०० रुपये गोळा झाले आहे.प्रसाद वाघमारे, शिवप्रभा ट्रस्ट, दीपक गंगात्रे, विजय भोरे, सचिन भालेकर, फकिरराव बोलके, अरविंद पवार, अनंतराव कुबडे, श्याम जिरोणकर, गोपाल भोरे, संजय गंगात्रे, भानुदास भुसारे, डॉ.राजकुमार थोरात, अरविंद गंगात्रे, ज्ञानेश्वर शिंदे, गजानन शिंदे, दत्तराव कदम, सुभाष भोकरे, विवेक शेळके, कैलास राठोड, प्रमोद शेळके, मनोज सोनटक्के, विश्वनाथ गंगात्रे, अविनाश महाजन, राजेश गंगात्रे, प्रवीण महाजन, धनंजय शेळके, संदीप शेळके, वैशाली शेळके, प्रफुल्ल चिल्लरवार, शुभम चिंतावार, संतोष शिंदे, अनिल मस्के, संजय काळे अशा नागरिकांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत गोळा केली आहे. यातून गजाननच्या डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी पाठबळ मिळणार आहे.आज देणार मदतसमाज बांधवांनी गोळा केलेली मदतीची रक्कम बुधवारी ८ मे रोजी गजाननचे वडील मनोज भुजाडे यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमरावजी गंगात्रे यांच्या हस्ते सुपूर्द केली जाणार आहे. त्यावेळी उमरखेड येथे परशुराम नरवाडे यांच्याकडे सर्व नाभिक समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आर्थिक मदतीसोबत समाजाकडून गजाननला आणि त्याच्या वडिलांना मानसिक दिलासा दिला जाणार आहे.

टॅग्स :docterडॉक्टर