शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्यात माघारलेल्या पदाधिकाऱ्यांना धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून दिली आहे.

ठळक मुद्देराळेगाव तालुका : राजकीय भविष्याची चिंता, पद जाण्याचीही भीती

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : विधानसभा निवडणुकीत राळेगाव तालुक्यात भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कामगिरी संमिश्र राहिली. याबाबतीत काही पदाधिकारी पास, काही नापास, तर काही चक्क वरपास झालेले आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आता आगामी महत्त्वपूर्ण निवडणुकीत श्रेष्ठींकडून निश्चित दखल घेतल्या जाणार आहे. कामगिरीनुसार तिकीट व पद देण्याचे धोरण राहणार असल्याने अनेकजण धास्तावले आहे.भाजपचे राळेगाव विधानसभा प्रमुख म्हणून व वरध जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे पास झाले आहेत. त्यांच्या झाडगावातही मोठे मताधिक्य मिळाले आहे. उषाताई भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून, शीला सलाम यांनी जळका पंचायत समिती गण, प्रशांत तायडे यांनी झाडगाव पंचायत समिती गणातून आघाडी मिळवून दिली आहे. सहकार आघाडी अध्यक्ष आशीष इंगोले यांनी पिंपरी, दुर्गमधून मोठी आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे प्रीती संजय काकडे यांची वडकी जिल्हा परिषद गट, स्नेहा येनोरकर धानोरा पंचायत समिती गण यात भाजपला पिछाडी राहिल्याने त्यांचा मतदारांवरील प्रभाव घटल्याचे समोर आले आहे. राळेगाव तालुक्यात भाजपला केवळ एक हजार नऊ मतांची तेवढी आघाडी मिळाली आहे.काँग्रेसमध्ये स्वत: उमेदवार असलेले प्रा. वसंत पुरके यांनी स्वत:च्या आठमुर्डी गावात चांगले मताधिक्य घेतले. सहकार नेते अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्या सावनेर, राळेगाव तालुका अध्यक्ष अरविंद फुटाणे यांच्या सावरखेड येथे काँग्रेसला मताधिक्य आहे. विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंद वाढोणकर यांच्या वाढोणा बाजारामध्ये व पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे यांच्या वाढोणाबाजार गणात काँग्रेस माघारली आहे. पंचायत समिती उपसभापती नीलेश रोठे यांचे वरध गण, ज्योती खैरकार यांच्या वडकी गणात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. बाजार समिती उपसभापतींच्या वेडशी गावात, खविसं अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या पिंपरी दुर्ग आणि रावेरी सरपंच राजेंद्र तेलंगे यांच्या गावात काँग्रेसला हे नेते मताधिक्य मिळवून देऊ शकले नाही. मात्र मताधिक्य देऊ न शकलेले कार्यकर्ते आणि विद्यमान पदाधिकाºयांमध्ये आता धाकधूक असल्याचे दिसून येत आहे.नगरपंचायतमध्ये उमेदवारीला धोकाराळेगावमध्ये दोन्ही पक्षांचे सर्वच महत्त्वपूर्ण नेते, पदाधिकारी वास्तव्यास आहे. त्यांचे सतत येथे राजकारण सुरू असते. भाजप तालुका अध्यक्ष बाळासाहेब कवीश्वर, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानंतर केवळ ५०४ मतांची आघाडी तेवढी भाजपला मिळाली आहे. राळेगाव शहरातील ११ मतदान केंद्रांपैकी नऊवर भाजपने आघाडी घेतली. काँग्रेसने केवळ दोनवर आघाडी मिळविली. यावरून काँगे्रसचे नगरसेवक, भाजपचे असंतुष्ट नगरसेवक व पदाधिकारी आपआपल्या प्रभागात, क्षेत्रात बेदखल ठरले असल्याचे स्पष्ट झाले. आगामी नगरपंचायत निवडणुकीत या सर्व अयशस्वी नगरसेवकांच्या तिकिटा धोक्यात आल्या आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण