शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आठ नगरपरिषदांवर प्रशासक

By admin | Updated: July 5, 2014 23:47 IST

जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राज्य शासनाने या नगराध्यक्षांंना मुदतवाढीचा निर्णय घेतला. कायदेशीर अडचणी आल्यामुळे शासनाने मुदतवाढीची

नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपला : २५ दिवसांच्या आत निवड प्रक्रिया यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. राज्य शासनाने या नगराध्यक्षांंना मुदतवाढीचा निर्णय घेतला. कायदेशीर अडचणी आल्यामुळे शासनाने मुदतवाढीची अधिसूचना ३ जुलै रोजी रद्द केली. ५ जुलैपासून पूर्वीचाच अधिनियम लागू असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ५ वाजता आठ नगराध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने पदभार उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. यवतमाळ, वणी, पुसद या नगरपालिकेचा प्रभार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. दारव्हा, दिग्रस, आर्णी, उमरखेड, घाटंजी नगरपरिषदेचा प्रभार तहसीलदारांकडे सोपविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीवरून रणधुमाळी नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. मात्र त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाने हा निर्णय मागे घेत नगराध्यक्षांना दिलेली मुदतवाढ रद्द केली. त्यामुळे नगराध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या पुढे नवीन नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया होईपर्यंत येथे प्रशासक कार्यरत राहणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून लवकरच नवीन नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडे २५ दिवसाचा अवधी आहे. तोपर्यंत नियुक्त केलेले उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहे. ६ जुलैचा रविवार आल्यामुळे ५ जुलैला दुपारनंतरच पदभार स्वीकारण्यात आला. नगरपंचायती व औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ च्या कलम ६० अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सर्वांनाच तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेशही दिले आहे. आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)