शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वणीच्या तेलीफैलावर प्रशासनाचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : सर्वाधिक म्हणजे २० रूग्ण असलेल्या तेलीफैलावर प्रशासनाने आता फोकस केला आहे. या परिसरात तपासणीचा ...

ठळक मुद्देसर्वाधिक रूग्ण : समस्यांबाबत नागरिकांची ओरड, तपासणीचा वेग वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सर्वाधिक म्हणजे २० रूग्ण असलेल्या तेलीफैलावर प्रशासनाने आता फोकस केला आहे. या परिसरात तपासणीचा वेग वाढविण्यात आला असून संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे या परिसरात मजुरदार वर्गाचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आल्याने बाहेरही पडता येत नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा प्रशासनानेच करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पेट्रोलपंप साखळीतील महिलेचा सेवाग्राम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर तेलीफैलमध्ये कोरोनाची नवीन साखळी तयार झाली. पाहतापाहता या भागातील रूग्णसंख्या २० वर पोहोचली. सध्यस्थितीत या २० पैकी आठजण कोरोनावर मात करून परतले असून अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १२ आहे. एकीकडे रूग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या या भागातील नागरिक क्षेत्र ओलांडून बाहेर जात होते. दोन दिवसांपूर्वी अशा सात जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून या भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांना बाहेरदेखिल पडता येणार नाही. येथील नागरिकांच्या मदतीसाठी दोन पथके गठीत करण्यात आली आहे. ही पथके नागरिकांना सशुल्क मागणीनुसार जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करतील. ३२२ लोकसंख्या असलेल्या या परिसरातील २७३ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर पालिकेकडून धान्याच्या किटही या परिसरात पोहोचविण्यात आल्या. या परिसरातील शेवटचा रूग्ण बरा होईपर्यंत हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम राहणार आहे.तेलीफैल भागात रोजमजुरी करणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. अशा गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांकडून सहकार्य घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच दानदात्यांचाही शोध घेतला जात आहे. या मदतीतून गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाणार आहे.- डॉ.शरद जावळेउपविभागीय अधिकारी, वणी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या