शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत प्रशासन वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:01 IST

येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही.

ठळक मुद्देलोकशाही दिनात तक्रार : सत्ताधारी सदस्य, पदाधिकारी अगतिक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील नगरपरिषदेत भाजपाकडे संपूर्ण बहुमत असूनही त्यांना सत्ताधारी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन राबविता येत नाही. पदाधिकारी, सदस्यांवर प्रशासनच वरचढ ठरल्याचे दिसून येते. अनेकांनी तर आता नगरपरिषदेत येणेच सोडून दिले. मंत्री, आमदार असूनही प्रशासन सत्ताधाºयांचे ऐकत नसल्याने पालिका पदाधिकाºयांना चक्क लोकशाही दिनात तक्रारी कराव्या लागत आहेत.यापूर्वी नगरपरिषद प्रशासनावर पदाधिकाºयांची पूर्णत: पकड होती. त्याकाळात शहराचा सर्वच बाबतीत राज्य पातळीवर लौकिक होता. शहरातील विकास कामांसाठी व दैनंदिन उपाययोजनांकरिता नगरसेवक एकत्र येऊन प्रशासनावर दबाव टाकत होते. पालिकेत पक्षीय भेदाभेद अपवादानेच पहावयास मिळत होता. मात्र दुर्दैवाने सध्या नगरपरिषदेत प्रत्येक जण पक्षाचा मुखवटा घेऊन वावरत असल्याने प्रशासनाला वेळ मारून नेण्याची आयतीच संधी चालून आली. परिणामी सत्तेत असूनही पदाधिकारी व नगरसेवक अगदी छोट्याछोट्या बाबींसाठी अगतिक झाले आहेत.राणाप्रतापनगरमध्ये एका बिल्डरने खुल्या जागेत अतिक्रमण केले. त्याची तक्रार खुद्द एका सभापतींनी केली. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पालिका प्रशासनापुढे सादर केली. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही. वारंवार विचारणा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी सभापतींना लोकशाही दिनात तक्रार करावी लागली. अनेक प्रकरणांमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा असाच अनुभव आहे.पालिकेत नगराध्यक्ष हे घटनात्मक पद शिवसेनेकडे, तर सभागृहात ठराव मंजूर करण्यासाठी लागणारे बहुमत भाजपाकडे आहे. उपाध्यक्ष ते विषय समिती सभापतीसुद्धा भाजपाचेच आहेत. त्यानंतरही येथील प्रशासन जुमानत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचा लाभ प्रशासन घेत असून एकाही निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होत नाही. यातच वाढीव क्षेत्रातील नगरसेवक तर अद्याप प्रशासनाचा अभ्यासच करीत आहेत. प्रशासन प्रमुख आणि पदाधिकाºयांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. अनेकदा तर वैयक्तीक पातळीवर आगपाखड केली जाते. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.प्रशासन तासिकेवर, ज्येष्ठ गप्पचनगरपरिषद प्रशासनाचा कारभार घड्याळी तासिकेप्रमाणे सुरू असून कार्यालयीन वेळ संपताच काम थांबते. एक दोन विभाग प्रमुख प्रामाणिकपणे काम करण्यासाठी झटतात. मात्र त्यांना ज्येष्ठांकडून साथ मिळत नाही. त्यामुळे सर्वसाधारण सभा असो वा इतरवेळी नगरसेवक व पदाधिकाºयांचा रोष सहन करणे एवढीच भूमिका या कर्तव्यतत्पर विभाग प्रमुखांची उरली आहे. जुन्या ज्येष्ठांनी गप्प बसून जे जे होते ते ते पहावे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आरोग्य, पाणीपुरवठा व बांधकाम विभागात बोंबाबोंग सुरू आहे. पदे रिक्त असल्याचे कारण पुढे करून प्रशासन प्रमुख जबाबदारी झटकत आहे. यामुळे सत्ताधाºयांची एकप्रकारे कोंडी झाली. पक्षाचेच कंत्राटदार काम करीत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत बोलण्याचीही सोय नाही.