शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
4
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
5
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
6
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
7
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
8
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
9
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
10
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
11
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
12
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
13
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
14
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
15
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
16
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
17
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
18
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
19
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
20
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

प्रशासनही होतेय पारदर्शक

By admin | Updated: December 1, 2014 23:02 IST

केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा,

कारभाराला गती : कर्मचाऱ्यांपुढे कागदी रिमऐवजी संगणक संचनांदेपेरा : केवळ शासकीय कार्यालयातच संगणकाचा वापर केला जातो, असे नाही, तर आता विविध कार्यालयात ‘ई’ प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे़ ग्रामपंचायतींमध्ये महा ई-सेवा संग्राम, महसूलमध्ये ई-सातबारा, ई-फेरफार, भूमिअभिलेखमध्ये ई-मोजणी आदी संगणक प्रणालीचा वापर करण्यात येत आहे़ यामुळे वेळेचा अपव्यय कमी होण्यास मदत होत आहे़ तहसील, पंचायत समिती, आरोग्य विभागासह प्रमुख कार्यालये आता आॅनलाईन सेवा घेत आहे़ या सर्व कार्यालयांशी ‘कनेक्ट’ राहून आपला ‘डाटा अपडेट‘ करण्यासाठी अशा कार्यालयात ‘ब्रॉडबँड’ कनेक्शनचा वापर केला जात आहे़ पंचायत समितीमध्ये मग्रारोहयो, घरकुल आदींची माहिती, कृषी विभागातील अनुदान वितरण, सहकार विभागात डाटा अपडेट, भूमिअभिलेख विभागात मोजणी वेळापत्रक, शिक्षण विभागात वेतन देयके, आदी कामे आता आॅनलाईन होत असल्याने कारभारात पारदर्शकता व सुलभता येत आहे़प्रत्येक गाव तालुका शहराशी कनेक्ट राहावे, ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी न येता गावातच विविध दाखले एका क्लिकवर मिळावे, याकरिता सर्व ग्रामपंचायतींना संगणक संच देण्यात आले आहे. त्यासाठी आॅपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. रहिवासी दाखला, जन्म-मृत्यू नोंदणी दाखला या विविध प्रकारच्या दाखल्याचे या ठिकाणावरून वितरण केले जात आहे़ शासकीय कामकाज करताना ‘पेपरलेस’ ही संकल्पना मार्गी लावण्यासाठी शासनाने संगणकाच्या वापरास चालना दिली आहे. परिणामी ग्रामपंचायत ते तहसील, पंचायत समिती आदी कार्यालये आॅनलाईन झाली आहेत़ संगणक प्रणालीचा वापर वाढल्याने गतीमान आणि पारदर्शक प्रशासन होण्यास हातभार लागत आहे़शासकीय कार्यालयात प्रशासकीय कामकाज पार पाडताना यापूर्वी सर्रास वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पध्दतीत सुधारणा करून हे कामकाज संगणकीय व आॅनलाईन पध्दतीने करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्रचलित पध्दतीत कागदी घोडे नाचविताना कालमर्यादा सांभाळली जात नव्हती़ याशिवाय पारदर्शकतेचा अभावही दिसून येत होता़ यामुळेच ‘पेपरलेस’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कार्यालयात संगणकाचा वापर वाढत आहे़ तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांपुढे आता कागदी रिमऐवजी संगणक संचच दिसून येत आहे़ (वार्ताहर)