शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

पुसद येथे आदिवासी एकता महोत्सव

By admin | Updated: August 11, 2016 01:14 IST

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदिवासी एकता महोत्सव आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात मंगळवारी करण्यात आले होते.

प्रबोधन कार्यक्रम : जागतिक आदिवासी दिन उत्साहात, ढेमसा नृत्याने लक्ष वेधले पुसद : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हास्तरीय आदिवासी एकता महोत्सव आणि प्रबोधनपर्वाचे आयोजन येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात मंगळवारी करण्यात आले होते. उद्घाटन आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा.वसंतराव पुरके, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.माधव सरकुंडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश इंगळे, परशराम डवरे, पुसद पंचायत समितीच्या माजी सभापती आशा पांडे, पंचायत समिती सदस्य प्रेम मेंढे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गणेश इनवाते, डॉ.हरिभाऊ फुपाटे, आदिवासी समाजसेवक श्याम व्यवहारे, रामकृष्ण चौधरी, श्रीराम कऱ्हाळे आदी उपस्थित होते. पुसदमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन आदिवासी कर्मचारी संघटना, बिरसा मुंडा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विद्यार्थी संघटनांसह अखिल आदिवासी चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात आदिवासी युवकांनी ढेमसा नृत्य सादर केले. यावेळी बोलताना मनोहरराव नाईक म्हणाले, आदिवासींना दिशा देण्यासाठी क्रांतिकारी बिरसा मुंडांची जयंती व जागतिक आदिवासी दिनाला शासकीय सुटी घोषित करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. शिवाजीराव मोघे म्हणाले, शिक्षणाचा अभाव व आर्थिक दुर्बलता हेच आदिवासीच्या विकासाचे अडसर आहे. सिलिंगचा कायदा, मूळ कायदा करून काँग्रेसने आदिवासी हिताचे कायदे केल्याचे त्यांनी सांगितले. वसंतराव पुरके म्हणाले, समाजाला चांगले नेतृत्व मिळाल्याशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे अध्यक्ष सुरेश धनवे यांनी केले. संचालन आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भास्कर मुकाडे यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी कर्मचारी संघटनेचे किसन भुरके, सुभाष गंधारे, लक्ष्मण नांदे, पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, नाना बेले, अ‍ॅड.रामदास भडंगे, किरण आत्राम, रमेश उमाटे, रामकृष्ण चौधरी, देवीदास डाखोरे, बालाजी उघडे, संदीप कोठुळे, सुरज गेडाम, दीपक खोपसे, गीता बळी, उज्ज्वल तडसे, सुरज बोडखे, फकिरा जुमनाके, शेषराव पांडे, आनंदराव भरकाडे, ज्ञानेश्वर तडसे, मारोतराव वंजारे, विजय मळघने, संजय डुकरे, नत्थू आढाव, किसनराव कुरकुटे, ग्यानबा काळे, आप्पाराव घुक्से उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)