शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात अधिक मासाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 10:59 IST

अधिक महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी लागणार आहे.

ठळक मुद्दे कोरोनामुळे घरातच व्रतवैैकल्ये कोरोनामुळे अनेक छोटी-मोठी मंदीरे प्रशासनाने बंद केल्याने अनेकांना घरातच आपले धार्मिक व्रतवैकल्ये पार पाडावी लागत आहे. अधिक मासात कोणताही सण नसतो. पण धार्मिक विधिला विशेष महत्व दिले गेले आहे. नागरिक कुलदैवतेचे दर्शन, नवस, मुं

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मराठी कालगणना ही चंद्राच्या गतीवर आहे. सूर्याची गती व चंद्राची गती यामध्ये दरवर्षी १० दिवसांचा फरक पडत असल्याने मराठी कालगणनेत दर तीन वर्षानंतर अधिकमास येतो. दर तीन वर्षाने अधिकमास येत असल्याने हिंदू धर्मामध्ये या महिन्यात अनेक धार्मिक व्रतवैकल्य केली जातात. परंतु पहिल्यांदाच कोरोनामुळे धार्मिकस्थळे बंद असल्याने व्रतवैकल्यावर मर्यादा आल्या आहेत.

मराठी महिन्याची गणना चंद्राच्या गतीवर निर्धारित असल्याने परिणामी गणनेमध्ये दरवर्षी साधारणपणे १० ते ११ दिवसांचा फरक पडतो, असे पंचांगकर्ते सांगतात. त्यामुळे मराठी कालगणना सूर्य गतीसोबत आणण्यासाठी दर तीन वर्षातून एकदा मराठी महिन्यात अधिक मासाचे नियोजन असते. अधिक अश्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिन्याला १८ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून १६ ऑक्टोबर रोजी अधिकमास संपत आहे. या एक महिन्याच्या कालावधीत येणारे सण अधिकमासामुळे पुढे ढकलल्या गेल्याने या महिन्यात एकही सण साजरा होणार नाही.

या महिन्याला हिंदू धर्मात धार्मिकदृष्टीने फार महत्व असते. नागरिक विविध मंदिरात जाऊन व्रतवैकल्ये करतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे सर्व लहान-मोठी मंदीरे पहिल्यांदाच बंद असल्याने व्रतवैकल्यावर पायबंद आल्याने अनेकांना आपली व्रतवैकल्ये घरातच पार पाडावी लागणार आहे.गेल्या काही वर्षांत अधिकमास सासुरवाडीसाठी कंबरडे मोडणारा ठरत आहे. या महिन्यात जुन्या-नव्या जावईबापुंना भोजन देऊन यथाशक्ती कपड्यांसह वस्तू भेट देण्याची परंपरा आहे.त्यामुळे सासरेबुवाचे कंबरडे मोडणाऱ्या या महिन्यात सासरची मंडळी जावयापासून अंतर ठेवम्याचा प्रयत्न करतात, तर जावई मंडळी सासरच्या मंडळीना फोन करून अधिकमास महिन्याची आठवण करून देत आहे.

धोंड्याच्या महिन्यात जावयाला होतो धनलाभधोंड्याचा महिना जावयासाठी लाभाचा महिना ठरला आहे. या महिन्यात खासकरुन जावयाना धोंडे जेवणासाठी सासुरवाडीला निमंत्रित केले जाते. तसेच त्यांना ऐपतीनुसार सासरवाडीकडून कपड्यासह एखादी भेटवस्तू दिली जाते. जावयासोबत अन्य मंडळीनासुध्दा आमंत्रित केले जाते. यात नवा-जुना असा भेद केला जात नाही. त्यामुळे धोंड्याचा महिना जावयासाठी पर्वणी, तर सासरच्या मंडळीची कसोटी पाहणारा असतो. अनेकदा भेटवस्तुच्या देण्याघेण्यावरून वादही समोर येतात.

टॅग्स :cultureसांस्कृतिक