शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाच्या डागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:17 IST

जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकºयावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे.

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांचा फार्स : व्याजमाफी करून मिळावे नवीन पीक कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळाने होरपळला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी कर्जपुनर्गठनाचे मृगजळ दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जपुनर्गठनातून शेतकऱ्यावर अतिरिक्त व्याजाचा भार लादल्या जाणार आहे. शासनकर्ते बँकांच्या धार्जिने धोरण राबवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला कायमचेच दफनायला निघाल्याचे दिसून येते.सातत्याने जिल्ह्यात चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणातूनच हा दुष्काळ निश्चित झाला आहे. दुष्काळी उपाययोजनेच्या नावाखाली मात्र शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज दराची वसुली करण्याचा घाट शासनकर्त्यांनी घातला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१८-१९ या खरीप हंगामासाठी एक हजार १८६ कोटी पीक कर्जाची उचल केली आहे. आता या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकºयांना दुष्काळामुळे सवलत मिळाली आहे. मात्र पुनर्गठनाने शेतकºयांसमोरील समस्या वाढणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर वाढीव मुदतीचे व्याजमाफ होणे अपेक्षित आहे. यावर प्रशासन चकारशब्द बोलायला तयार नाही. उलट दुष्काळात कर्जपुनर्गठन करून पुढील हंगामासाठी नव्याने कर्ज दिले जाईल. संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला दोन्ही वर्षाच्या पीक कर्जाची व्याजासह परतफेड करावी लागणार आहे. यातून पुन्हा शेतकरी कायमचाच कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापुढील हंगामासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जच मिळणार नाही. एकंदर शेतकऱ्यांला कायम अतिरिक्त व्याजाच्या चक्रव्युहात अडकवून राज्य शासन आपण शेतकऱ्यांसाठी फार उदार भूमिका घेऊन धोरण ठरवित असल्याचा देखावा करीत आहे.गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आर्थिक दृष्ट्या हलाखीची झाली आहे. केवळ कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. त्याकरिता कर्जावरील व्याजही माफ करणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावच शासनाकडे सादर करण्यात आला आहे.किशोर तिवारी,अध्यक्ष, स्वावलंबन मिशनयावर्षीची स्थिती पाहता राज्य शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र कर्जपुनर्गठन करून हा प्रश्न सुटणार नाही. अतिरिक्त व्याजाने शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जच माफ करावे.- मनीष जाधवस्वाभिमानी शेतकरी संघटना.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज