शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन, चार संगणक जप्त

By admin | Updated: September 20, 2016 01:59 IST

पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी

यवतमाळ : पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. न्यायालयाच्या आदेशावरून सोमवारी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन व चार संगणक संच जप्त करण्यात आले. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. खैरी येथील शेतकरी सोमेश्वर दिगंबर महाजन यांची शेतजमीन पुनर्वसनाकरिता शासनाने संपादित केली. मात्र, १९९८ पासून या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. अखेर या शेतकऱ्याने मोबदल्याकरिता न्यायालयीन लढाई सुरू केली. ८ डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला. शेतकऱ्याला चार महिन्यात व्याजासह मोबदला देण्यात यावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, शेतकऱ्याला शासनाकडून अद्यापही मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकरी महाजन यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. यात अपर जिल्हाधिारी लक्ष्मण राऊत यांचे वाहन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील चार संगणक जप्त करण्यात आले. जप्तीची ही कार्यवाही बेलीफ अनिल निकम यांनी केली. तर शेतकरी महाजन यांच्या तर्फे अ‍ॅड. नीलेश चवरडोल यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)