शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:12 IST

येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली.

ठळक मुद्देन्यायमूर्तींकडून जागेची पाहणी : तहसीलमागील पालिकेच्या भूखंडाचा पर्याय

दत्तात्रय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली.उमरखेड, महागाव येथील वकील संघटना आणि जवळपास ९० ग्रामपंचायतींसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी गेल्या दोन वर्षांपासून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय निर्माण करण्याची मागणी लावून धरली आहे. वकील संघटनेने संयुक्तपणे या न्यायालयासाठी १७ एप्रिल २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाचे यवतमाळ जिल्हा पालक न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेटकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, तहसीलदार भगवान कांबळे, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण देवसरकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. आय.वाय. सय्यद, सचिव राजेश सुरोशे, याचिकाकर्ते अ‍ॅड. निरंजन कदम आदींनी जागेची पाहणी केली.पुसद रोडवरील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प सिंचन विभाग क्र. २ मध्ये संपूर्ण इमारतींची पाहणी आटोपल्यानंतर न्यायमूर्तींनी तहसील मागील नगरपरिषदेच्या भूखंडामधील सर्वे क्र. ३०२ मधील रिकाम्या जागेचीही पाहणी केली. शहरात उपलब्ध आणि रिकाम्या जागांची पाहणी केल्याने लवकरच उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रसंगी अ‍ॅड. अस्मिता टाकणखारे, अ‍ॅड. संजय जाधव, जितेंद्र पवार, मनोज काळेश्वरकर, उमेश तिवारी, शिवाजी वानखेडे, अ‍ॅड. शंकर मुनेश्वर, अ‍ॅड. भंडारी, तलाठी दत्तात्रय दुर्केवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम व सिंचन विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालय