शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी सरपंचासह पुसद तालुक्यात १६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू । कोरोना बाधितांची संख्या हजारांवर, १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

पुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. शनिवारी श्रीरामपूर येथील माजी सरपंचासह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोबतच एका महिलेचा मृत्यू झाला. तूर्तास तालुक्यात १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण झाले असून एकूण बाधितांची संख्या हजाराच्यावर पोहोचली आहे.गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाने सर्वत्र विळखा घातला आहे. शनिवारी शहरालगतच्या श्रीरामपूर येथील माजी सरपंचायसह १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना बळींची संख्या २९ झाली आहे. सध्या १९० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा एक हजार ५३ वर पोहोचला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ८३८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.शहर आणि तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शनिवारी ६७ नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात १२ पॉझिटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. याशिवाय १४१ नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर १३७ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरातील वसंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.पुसदसह उपविभागातील दिग्रस तालुक्यातही सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिग्रस तालुक्यातही आतापर्यंत कोरोनाने १७ नागरिकांचे बळी घेतले आहे. दिग्रस शहर व तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांची भर पडत आहे. शनिवारी दुपारपर्यंत दिग्रस तालुक्यातील ११ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी दिग्रस शहरातील एक पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याने पुसद व दिग्रस या दोन्ही तालुक्यात प्रशासनाची तारांबळ उडत आहे. नागरिकांमध्ये धास्ती असली तरीही अनेक नागरिक बिनधास्तपणे वावरत असल्याचे दिसत आहे.साखळी तोडण्यासाठी ‘एसएमएस’चा अवलंबशहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आता एसएमएसचा अवलंब करण्याची गरज आहे. एसएमएस अर्थात सोशल डिस्टन्सिंग मास्क व सॅनिटायझर वापराची त्रिसूत्री आहे. या त्रिसुत्रीने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासन वारंवार या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन करीत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या नेतृत्वात प्रशासकीय यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या