शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दूरचे नातेवाईक जोडा एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 22:13 IST

पूर्वी घरी भाट आले की सात पिढ्यांच्या नातेवाईकांची जंत्री सादर करायचे. आता युग तंत्राचे आहे. आता हातातला मोबाईलच भाटाचे काम करणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळात आला मोबाईल अ‍ॅप : विविध सामाजिक नेत्यांना दिला डेमो

अविनाश साबापुरे ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : पूर्वी घरी भाट आले की सात पिढ्यांच्या नातेवाईकांची जंत्री सादर करायचे. आता युग तंत्राचे आहे. आता हातातला मोबाईलच भाटाचे काम करणार आहे. एका क्लिकवर सात पिढ्यांची आणि साता समुद्रापारच्याही नातेवाईकांची माहिती मिळवा. तेही मोफत!होय, यवतमाळात त्यासाठी खास मोबाईल अ‍ॅप पोहोचला आहे. ‘माय परिवार अ‍ॅप’! पालकमंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात विविध समाजाच्या नेत्यांना या अ‍ॅपचा डेमो दाखविण्यात आला. भारतात व्हॉट्सअपसारख्या विदेशी अ‍ॅपवर सध्या समाजाचे, जातीचे, नातेवाईकांचे ग्रुप तयार होत आहेत. त्यातून विदेशी माणसे श्रीमंत होत आहेत.‘माय परिवार’ याहीपेक्षा अद्ययावत अ‍ॅप असून तो भारतीय, वैदर्भीय माणसाने तयार केला आहे. बुलडाण्याचे मुरलीधर भुतडा यांनी तयार केलेला हा अ‍ॅप संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अभिषेक वखरे यांच्याकडे आहे.अ‍ॅपची कार्यप्रणालीकुटुंबातील एखाद्याने आपल्या परिवारातील सदस्यांची माहिती या अ‍ॅपवर भरली की त्याला त्याच्या जगभरातील नातेवाईकांची माहिती मिळेल. फक्त त्यासाठी अ‍ॅपमधील ‘रिलेटीव्ह’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. हल्लीच्या मुलांना आईवडील, आजी आजोबा आणि काका, मामा या पलिकडचे नातेवाईक नेमके सांगता येत नाही. त्यामुळेच नव्या पिढीसाठी हा अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. लग्नाची पत्रिका सर्व नातेवाईकांना एका क्लिकवर पाठविण्याची सुविधा यात आहे. नातेवाईकांच्या वाढदिवसाचे ‘रिमार्इंडर’ हा अ‍ॅप देईल.जातीसमूहांसाठी विशेष सोयएखाद्या जातीसमूहासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत, त्या कितपत राबविल्या गेल्या, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा आदी माहिती या अ‍ॅपवरून मिळणार आहे. त्यासाठी समाजाच्या नावाने ‘पासकोड’ घेऊन ग्रुप रजिस्टर्ड करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात समाजकल्याण आयुक्तांनी भुतडा यांना पत्र देऊन असे ग्रुप तयार करण्याची सूचना केली आहे.अपहृतांना शोधा झटक्यातएखाद्याचे अपहरण झाले आणि त्याच्याकडील मोबाईलही बंद आहे. अशा स्थितीत तो ‘माय परिवार’ अ‍ॅपवर असले तर त्याचे नातेवाईक फक्त त्याच्या क्रमांकावर क्लिक करून त्याचे ‘लोकेशन’ मिळवू शकतील, असा दावा अ‍ॅपचे निर्माते मुरलीधर भुतडा यांनी केला.राजकीय वापराची शक्यताप्रत्येक समाजाची, प्रत्येक कुटुंबाची अपडेट माहिती ठेवणारा हा अ‍ॅप निवडणुकीवर डोळा ठेवूनही वापरला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार संग्राम जगताप यांनीही त्याबाबत माहिती घेतली आहे. तर बुधवारी सायंकाळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयातही डेमो देण्यात आला.

टॅग्स :Mobileमोबाइल