शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अमृतच्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून काळया यादीत टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:26 IST

शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देभावना गवळी : मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या योजनेचे काम करणा-या ठेकेदाराला काळया यादीत टाकून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार भावनाताई गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे केली.बेंबळा प्रकल्पातून प्रस्तावित अमृत योजनेच्या कामाला केंद्र सरकार व राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी दिला आहे. या योजनेचे काम नाशीक येथील आडके कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. सध्या पाईप लाईन टाकण्याचे तसेच त्याच्या टेस्टींगचे काम सुरु आहे. टेस्टींग दरम्यान टाकळी व गळव्हा परिसरात पाईपलाईन फुटून शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात नागरीकांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम असतांनाही जीवन प्राधिकरणचे अधिकारी बोलायला किंवा खुलासा करायला तयार नाही.सदर कंत्राटदाराने मिळालेले हे काम पोटकंत्राटदांरांना दिले असून त्यांना अशा मोठया कामांचे अनुभव नसल्याने कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे दिसून येत आहे. पाईप टाकण्यासाठी खोदलेल्या नाल्या तत्परतेने तसेच व्यवस्थित बुजविण्याची तसदीसुध्दा घेतल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या कंत्राटदाराला आता काळया यादीत टाकण्याची तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी तक्रारीतून केली आहे.क्वालिटी कंट्रोलकडून व्हावी तपासणीपाण्याच्या दाबामुळे पाईपचे मोठमोठे तुकडे पडत असल्याचे दोन घटनेत दिसून आले आहे. भविष्यात शहरात अशी घटना घडली तर अघटीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण कामाची वरिष्ठ स्तरावरील क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याची मागणी खासदार गवळी यांनी केली आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी