शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जातीचा बनावट दाखला देणारी टोळी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:47 IST

तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : गुन्हा दाखल, दाखल्यांची होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे.उमरखेड तालुक्यातील सुकळी येथील सविता आनंदराव वानखेडे या युवतीने कुणबी जातीचा बनावट दाखला बनववून घेतला. सदर प्रकार निदर्शनास येताच उमरखेड महसूल विभागातर्फे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे उमरखेड तालुक्यात जातीचे बनावट दाखले तयार करून वितरीत करणारी टोळी सक्रीय असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.सविता वानखेडे या युवतीचा कुणबी जातीचा दाखला बनावट असल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्या दाखल्याच्या सत्यप्रतीची शहानिशा करण्यात आली असता, या दाखल्यावर अनुक्रमांक ५७३२ असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची चौकशी केली असता विजय वसराम चव्हाण रा. धानमुख यांच्या बंजारा जातीचा हा दाखला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सविता वानखेडे हिचा जातीचा दाखला बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी सविता वानखेडे यांच्याविरुद्घ पोलिसात लेखी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यामुळे टोळी सक्रीय असल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.नागरिकांना आवाहनअशाप्रकारे बनावट जातीचे प्रमाणपत्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात वितरित केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना असा प्रकार आढळल्यास त्यांनी याबाबतची माहिती त्वरित महसूल प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.