शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

वॉर्डात फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने नगरपरिषदेने शहरातील १५१ भाजीपाला व फळांच्या दुकानांची स्थान निश्चिती केली. आता उन्हाच्या तडाख्यामुळे या सर्व तिन्ही ठिकाणी मंडप उभारला. संचारबंदीमुळे केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी आहे. यात नेमून दिलेल्या ठिकाणीच नागरिकांना भाजीपाला व फळे मिळणार आहे.

ठळक मुद्देपुसद पालिकेचा निर्णय : शहरात केवळ तीन ठिकाणीच मिळेल भाजीपाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : नगरपरिषदेने फळ व भाजी विक्रेत्यांना निश्चित जागा नेमून दिली. या जागेशिवाय वॉर्डात फिरणाºया फळ व भाजी विक्रेत्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात तीनच ठिकाणी भाजीपाला व फळ खरेदी करता येणार आहे.कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने नगरपरिषदेने शहरातील १५१ भाजीपाला व फळांच्या दुकानांची स्थान निश्चिती केली. आता उन्हाच्या तडाख्यामुळे या सर्व तिन्ही ठिकाणी मंडप उभारला. संचारबंदीमुळे केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी आहे. यात नेमून दिलेल्या ठिकाणीच नागरिकांना भाजीपाला व फळे मिळणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेचे बंधन आहे. यापुढे अवैधपणे वॉर्डात फिरणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. चोख व्यवस्थापनासाठी तीन नियंत्रण अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाºयांची तीन पथके तैनात करण्यात आली आहे.कारला रोडवरील जिनिंग क्रमांक २, वाशिम रोडवरील शिवाजी विद्यालयाचे प्रांगण व यशवंत स्टेडीयमवर एकूण १५१ भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या. मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांच्या पुढाकाराने जिनिंग क्रमांक-२ मध्ये ८५ फळे व भाजीपाला विके्रत्यांना गुलाबी रंगाची पास दिली. नियंत्रण अधिकारी अविनाश अर्धापूरकर यांच्या मार्गदर्शनात चार कर्मचाºयांचे पथक तैनात करण्यात आले. यशवंत स्टेडीयमवर ४८ फळे व भाजीपाला विक्रेत्यांना पिवळ््या रंगांच्या पास दिला. नियंत्रण अधिकारी धर्मेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात, तर शिवाजी विद्यालयात १८ फळे व भाजीपाला विक्रेत्यांना निळ््या रंगांच्या पास देऊन नियंत्रण अधिकारी म्हणून प्रशांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले.गर्दी टाळण्यासाठी केली उपाययोजनापालिकेने गर्दी टाळण्यासाठी फळे व भाजीपाला विके्रत्यांसाठी पिवळ््या, निळ््या व गुलाबी रंगांच्या पासेस दिल्या. त्यांची स्थान निश्चिती केली. तरीही काही भाजी विक्रेते हातगाडी, सायकल, मोटारसायकल आदींमार्फत वॉर्डात फिरून भाजीपाला व फळांची विक्री करीत असल्याची माहिती आहे. त्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या