शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: July 17, 2016 00:38 IST

पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता येथील शिवाजी वार्डात घडली.

पुसद : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन गटांत हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता येथील शिवाजी वार्डात घडली. यावेळी चाकूहल्ल्यात एक तरुण जखमी झाला. दोनही गटातील २१ जणांवर गुन्हा नोंदविला. शिवाजी वार्डातील बेबीबाई अशोक थोरात (५०) ही मुलगा मनीष याला घेऊन रुग्णालयात जात होती. मार्गात शेख मुस्तकीन याने मनीषवर चाकूहल्ला केला. बेबीबाईने मदतीसाठी धावा केला. मदतीसाठी आलेल्यांवरही लाठीकाठीने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, ठाणेदार गजानन शेळके, सहायक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण आदी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. बेबीबाई थोरात यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन नाजीयाबी शेख अख्तर, आशियाबी शेख रऊफ, शेख अख्तर शेख मुस्तफा, सै.मन्सूर सै. हुसेन, शेख शाहरुख शेख रऊफ, शेख चाँद, शेख शब्बीर, शेख शकीर, शेख नदीम शेख अख्तर, शेख रफीक परवीनबी, शेख सलमान, शेख मुस्तकीन यांच्यावर गुन्हा नोंदविला. दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून बेबी थोरात, अशोक थोरात, मंदा थोरात, शिवाजी थोरात, जगन थोरात, मनीष थोरात, राजू थोरात, माजी नगरसेवक मंगळे या आठ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. शेख अख्तर शेख मुस्तफा, सै.मन्सूर सै. हुसेन, शेख शाहरुख शेख रऊफ यांना अटक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (प्रतिनिधी)