शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: June 4, 2016 02:08 IST

जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी आदर्श म्हणून गौरविलेल्या नाकापार्डी येथील ग्रामसेविकेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ...

तीन हजारांची लाच : आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडेच पैशाची मागणीयवतमाळ : जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी आदर्श म्हणून गौरविलेल्या नाकापार्डी येथील ग्रामसेविकेला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्याकडून तीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शुक्रवारी यवतमाळातून ताब्यात घेण्यात आले. सविता अनंतराव बोरखडे (४०) असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या ग्रामसेविकेचे नाव आहे. बोरखडे ही यवतमाळ तालुक्यातील नाकापार्डी ग्रामपंचायतीत कार्यरत आहे. नाकापार्डी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्याला शासनाकडून विहीर मंजूर झाली. या विहिरीसाठी ८५ हजार ४४८ रुपयांचा धनादेश तयार होता. परंतु ग्रामसेविका सविता बोरखडे यांनी या धनादेशासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली. त्यावरून संबंधित शेतकऱ्याने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून चौकशी केली असता त्यांनी तीन हजार रुपये घेतल्याचे पुढे आले. एसीबीचे पथक शुक्रवारी नाकापार्डीत धडकले. परंतु ग्रामसेविका तेथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे यवतमाळातील वडगाव रोड परिसरातील त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले. या घटनेने प्रशासनातील कर्मचारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाबाबत किती संवेदनशील आहे हे दिसून आले. बळीराजा चेतना अभियानातून शेतकऱ्यांना बळ देण्याचा कांगावा प्रशासन करीत असताना त्याच प्रशासनातील पुरस्कार प्राप्त ग्रामसेविका मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला पैशाची मागणी करतात, हे पुढे आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अस्मिता नगराळे, कर्मचारी अमोल महल्ले, शैलेश ढोणे, नीलेश पखाले, अरुण गिरी, नरेंद्र इंगोले, अनिल राजकुमार, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, विशाल धलवार यांनी केली. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)