शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीने मारली न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:56 IST

तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली.

ठळक मुद्देपळून जाण्याचा प्रयत्न : हात आणि पाय फ्रॅक्चर, खुनातील आरोपी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. यात आरोपीचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.विनोद बाबाराव कानबाले (३०) रा.नेर असे या आरोपीचे नाव आहे. २०१७ मध्ये खुनाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी न्यायालयात तारखेवर हजर करण्यासाठी आणण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.टी. वानखडे यांच्या कोर्टासमोर आरोपी बसून होता. पुकारा होताच पोलिसांनी त्याच्या हातकडीचा दोर सोडला. याच संधीचा फायदा घेत विनोदने जिन्यावरच्या रेलिंगवरून खाली उडी मारली. आरोपी पळून जातो हे पाहताच पोलीस शिपायानेही त्याच्या पाठोपाठ उडी घेतली. यात आरोपी विनोदच्या डाव्या पायाला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तो जागेवरच विव्हळत पडला होता. गार्डवर असलेल्या पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. शासकीय वाहन बोलाविले. त्यानंतर या आरोपीला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होता.तारखेवर आलेल्या आरोपीने अचानक उडी मारून पळण्याचा प्रयत्न का केला, याचा शोध घेणे गरजेचे आहे. यापूर्वीही त्याच्याकडून दोन वेळा असा प्रयत्न झाल्याचे खुद्द पोलिसांकडूनच सांगितले जात आहे.