पुसद : येथील दिग्रस मार्गावर पुसदपासून चार किलोमीटर अंतरावर वरूडजवळ टाटा इंडिका व मालवाहू अॅपे आॅटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण जखमी झाले.जखमींमध्ये यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तीन कर्मचारी व अॅपे चालकाचा समावेश आहे. ही घटना बुधवारी दुपारी येथील मानस ढाब्यासमोर घडली. जखमींमध्ये एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, शिपाई भारत चिरडे, किरण खेडेकर व अॅपेचालक माधव जाधव यांचा समावेश आहे. एसीबीचे कर्मचारी टाटा इंडिका एम.एच.२६/ई-१८२६ ने दिग्रसहून पुसदकडे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अॅपे एम.एच.२९/एम-८८५२ सोबत समोरासमोर धडक झाली. जखमींना नागरिकांनी प्रथम पुसद उपजिल्हा रुग्णालयात नेले. या प्रकरणी एसीबीचे नंदकुमार जामकर यांच्या तक्रारीवरून अॅपेचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)
‘एसीबी’च्या वाहनाला अपघात, तिघे जखमी
By admin | Updated: May 7, 2015 01:46 IST