शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिकस्तर रचना पुन्हा बदलणार;  नवा मसुदा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:22 IST

सर्व शिक्षण अभियानाने सुरू केलेली शैक्षणिकस्तर रचना मोडून नवीन ५+३+३+४ ही नवी स्तर रचना सुरु करण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरण २०१९ मध्ये करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्यात आला.

ठळक मुद्दे बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची शिफारस

विनोद ताजने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्व शिक्षण अभियानाने सुरू केलेली शैक्षणिकस्तर रचना मोडून नवीन ५+३+३+४ ही नवी स्तर रचना सुरु करण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरण २०१९ मध्ये करण्यात आली. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा शुक्रवारी नवे मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल यांना सादर करण्यात आला. हा मसुदा इस्त्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वात आठ सदस्यीय समितीने तयार केला. यामध्ये प्रसिद्ध गणितज्ज्ञ मंजुळ भार्गव यांचा समावेश होता.१९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. त्यात १९९२ मध्ये वेळोवेळी दुरुस्ती करून आत्तापर्यंत या धोरणाच्या आधारेच शिक्षण प्रणाली सुरु आहे. कोठारी आयोगाने १०+२+३ अशी स्तर रचना केली होती. सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ अन्वये ही स्तर रचना ५+३+२+२ अशी करण्यात आली. आता नव्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक शिक्षण ९ वी ते १२ वीपर्यंत एकत्रित करण्यात आले. दहावीनंतर विविध शाखांची निवड बंद करून विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रत्येक वर्गात दोन सेमीस्टर पद्धती राहील. चार वर्षातील आठ सेमीस्टरमध्ये विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान विषयासह २४ विषय शिकणे बंधनकारक राहणार आहे.स्तर रचनेमध्ये (५+३+३+४) पाच वर्षे बरोबर पूर्व प्राथमिक तीन वर्षे अधिक पहिली व दुसरीचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात तीन वर्षे बरोबर तिसरी ते पाचवी, तिसऱ्या स्तरात तीन वर्षे बरोबर सहावी ते आठवी आणि चौथ्या स्तरात चार वर्षे बरोबर नववी ते बारावी, असा स्तर राहणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करणे, मनुष्यबळ मंत्रालयाचे नाव शिक्षण मंत्रालय करणे, खासगी शिक्षण संस्थाच्या शुल्क वाढीला आळा घालणे या शिफारशीसुद्धा करण्यात आल्या आहे.खासगी संस्थांना त्यांचे शिक्षण शुल्क ठरविण्याचा अधिकार असेल. मात्र तो नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता करावा लागेल. शैक्षणिक शुल्कामध्ये सत्राच्या मध्येच वाढ करता येणार नाही. शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘राज्य शाळा नियंत्रण प्राधिकरण’ नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वीही माजी कॅबिनेट सचिव टी. एस.आर. सुब्रमण्यम यांनीही तत्कालीन मनुष्यबळ मंत्री स्मृती ईराणी यांना अहवाल सादर केला होता. त्याचाही समावेश नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.मोफत शिक्षणाची व्याप्ती वाढविलीशिक्षण अधिनियम २००९ मध्ये १४ वर्षांपर्यंत म्हणजे आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत शिक्षणाच्या आवाक्यात होते. आता नव्या शैक्षणिक धोरणात बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची शिफारस आहे. तसेच सध्याचे मध्यान्ह भोजनाचे नाव बदलवून ‘पौष्टीक न्याहारी’ असे करण्यात येणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र