शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपने मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:54 IST

महाविद्यालयांमधील छात्रसंघाच्या निवडणुकांबाबत शिक्षण मंत्री चालढकल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांसह, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

ठळक मुद्देनारेबाजी : छात्रसंघाची निवडणूक घेण्याची मागणी, विद्यार्थ्यांनी मांडली मते

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाविद्यालयांमधील छात्रसंघाच्या निवडणुकांबाबत शिक्षण मंत्री चालढकल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी अभाविपच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांसह, मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.दाते कॉलेज चौकात झालेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी तीनही मंत्र्याविरुद्ध प्रचंड नारे दिले. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार छात्रसंघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने घेणे आवश्यक आहे. पण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात छात्रसंघ निवडणुका बंदच आहे. लोकशाही पद्धतीने निवडणुका न घेता छात्रसंघ सिलेक्शन पद्धतीने घेण्याचा सरकारचा डाव आहे. याबाबतचे विधेयकही सरकारने आणले आहे. याबाबीचा अभाविपने तीव्र निषेध केला. यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या विरोधात नारे लावून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. प्रलंबित शिष्यवृत्ती, सेमिस्टर पॅटर्न, खुल्या छात्रसंघ निवडणुका यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मते मांडली.यावेळी अभाविपचे नगर सहमंत्री युवराज आगळे, कौस्तुभ मोहदरकर, गौरव जगताप, धिरज शिंदे, पियुष पंचबुद्धे, ऐश्वर्या बैस, प्रांजली दंडे, मंजुषा खर्चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.