शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

६५० गाळेधारकांकडे अडीच कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:53 IST

नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा कर भरावा लागणार आहे. पालिकेने नोटीसा बजावत ३१ जुलैचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांकडून अजिबात प्रतिसाद नाही.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा सेवाकर : नोटीस जारी, ३१ जुलैचा अल्टीमेटम, मात्र गाळेधारकांची मुजोरी कायम
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने शहरात विविध भागांत ६५० गाळे बांधून भाडेतत्त्वावर दिले आहे. मात्र, गाळेधारकच नगरपरिषदेवर शिरजोर झाले असून दहा वर्षांपासून सेवा करच भरला नाही. सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी नगरपरिषदेवर सक्तीची वसुली लादली. दोन कोटी ७१ लाख ४१ हजारांचा सेवा कर भरावा लागणार आहे. पालिकेने नोटीसा बजावत ३१ जुलैचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांकडून अजिबात प्रतिसाद नाही.नगरपरिषदेला दुकान भाडे आणि सेवा कर वसूल करावा लागतो. शहरातील ६५० दुकानदारांकडून २००८ पासून सेवा करच वसूल केला गेला नाही. मूळ ६९ लाख ४४ हजार ९५७ रुपये असलेला सेवा कर व्याज आणि दंड यामुळे पावणेतीन कोटीच्या घरात पोहोचला. नगरपालिका प्रतिसाद देत नसल्याने सेवा कर विभागीय आयुक्तांनी थेट पालिकेवर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बजावली. यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ न्यायालयात धाव घेऊन सेवा करात लावण्यात आलेला दंड, व्याज व विलंब शुल्क कमी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. यावर अजून निर्णय लागायचा आहे. सोबतच नगरपरिषद बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावून ३१ जुलैची मुदत दिली. यानंतर सेवा कर भरणाऱ्यांवर अतिरिक्त दंड आकारला जाईल, असा इशाराही दिला. मात्र यालाही गाळेधारक जुमानत नसल्याचे दिसून येते. ३० जुलैपर्यंत केवळ तीन ते चार जणांनीच सेवा कराचा भरणा केला. गाळेधारक पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते. आता ३१ जुलैनंतर सेवा कराच्या वसुलीसाठी बाजार विभाग कुठली शक्कल लढवतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा आर्थिक संकटातील नगरपरिषदेवर स्वत:च्या गंगाजळीतून पावणेतीन कोटींचा सेवा कर जमा करावा लागण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.आठवडीबाजारातील गाळ्यांना प्रतिसाद नाहीनगरपरिषदेने आठवडीबाजार परिसरात संकुल बांधून ४० गाळे काढले. या गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यात ४० जणांची निवड झाली. आता अनामत रक्कम जमा करून गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी कुणीच पुढे येताना दिसत नाही. नगरपरिषदेने दरमहा ठरविलेल्या भाड्यानुसार वर्षभराचे भाडे अनामत रक्कम म्हणून मागितले आहे. त्याचा भरणा करण्यासाठी चार महिन्यांपासून स्मरणपत्र दिले जात आहे. पण प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता निविदा अनामत रक्कम जप्तीची कारवाई केली जाणार आहे.