शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:10 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देकिमान वेतनाची मागणी : पेन्शन व सामाजिक सुरक्षा द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. केंद्रीय कामगार संघटनेने ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारला. त्याच अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडीतार्इंनी बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.भारतीय श्रमपरिषदेच्या शिफारसींची राज्य शासनाने अंमलबजावणी करीत अंगणवाडीतार्इंना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा द्यावा, कमीत कमी १८ हजार रुपये वेतन द्यावे, सहा हजार रुपये पेंशनसहित सामाजिक सुरक्षा द्यावी, एकात्मिक बालविकास योजनेच्या कोणत्याही कामाचे खासगीकरण करू नये, सामाजिक उपक्रमासाठी पुरेसा निधी द्यावा, केंद्राने जाहीर केलेली मानधन वाढ लागू करावी, अंगणवाड्यांचे वाढीव भाडे देण्यात यावे, टीएचआर बंद करून १२ रुपये प्रतिदिवस देण्यात यावा, थकीत देयके ताबडतोब द्यावी, वर्षातून १५ दिवसांची पगारी रजा मंजूर करावी, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्या अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उषा डंभारे, विजया सांगळे, ज्योती कुलकर्णी, मनीष इसाळकर, सविता कट्यारमल, पल्लवी रामटेके आदींसह जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोर्चात सहभागी झाल्या होत्या.आयटक जनसंघाचा रास्ता रोकोकेंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे ४३ कोटी असंघटित कामगार बेरोजगार झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक जनसंघाच्यावतीने यवतमाळातील स्थानिक बसस्थानक चौकात बुधवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या भांडवलदार धार्जिण्या धोरणाचा निषेध करीत शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळावा अशीही मागणी करण्यात आली. यावेळी अब की बार जुमले के सरकारी हार अशा प्रकारचे नारे देण्यात आले. आंदोलनात संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, दिवाकर नागपुरे, ममता भालेराव, शोभा बांबल, सुभाशिनी धोंगडे, विजय ठाकरे, गया सावळकर, रचना जाधव आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा