शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमिरला चिरेबंदी वाड्याची भुरळ

By admin | Updated: April 28, 2017 02:34 IST

दगडी चिऱ्यांनी बांधलेला आणि लाकडी कोरीव काम असलेल्या खऱ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा कृष्णापूरच्या चिरेबंदी वाड्याने ...

 कृष्णापूरला भेट : गावात आमिरच्या साधेपणाची चर्चा राजेश पुरी  ढाणकी दगडी चिऱ्यांनी बांधलेला आणि लाकडी कोरीव काम असलेल्या खऱ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा कृष्णापूरच्या चिरेबंदी वाड्याने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याला भुरळ घातली. पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आला असता ग्रामीण संस्कृती आमिरला चांगलीच भावली. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या पाहणीसाठी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान बुधवारी उमरखेड तालुक्यातील एकंबा आणि कृष्णापूर येथे येऊन गेला. आमीरसारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सिनेअभिनेता कृष्णापूरसारख्या लहानशा गावात आला आणि त्याने गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाची. दुसऱ्या दिवशीही आमिरच्या या भेटीचीच चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. मात्र आम्मिर खानला भावला तो बंदीभागातील साधासुदा माणूस. श्रमावर विश्वास ठेवत जगण्याशी दोन हात करणारी कुटुंब. या सर्वात आमिर रमला असेल तर तो भास्कर पाटील कदम यांच्या जुन्या चिरेबंदी वाड्यात. आमिर खानचे गावात आगमन झाल्यानंतर कुठे थांबवावे, हा तसा प्रश्नच होता. त्यासाठी आमीरच्या टीमने गावातील पाच-सहा घरांची पाहणी केली. गावातील भास्करराव कदम यांचा जुना चिरेबंदी वाडा या टीमला पसंत पडला. आमीरला थांबण्यासाठी हा वाडा निश्चित करण्यात आला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कृष्णापूर येथे आगमन झाले. थेट भास्करराव पाटील वाड्यात त्याला नेण्यात आले. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा हा वाडा पाहून आमीरही चकीत झाला. दगडी चिऱ्यांनी बांधलेला हा वाडा लाकडी कोरीव काम आहे. या वाड्याच्या ओसरीत आमीर आणि त्याची पत्नी किरण राव काही काळ विसावले. त्या ठिकाणीच त्यांनी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे आणि गावातील स्त्रियांशी संवाद साधला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने भाग घेतला. सुरुवातीला प्रशिक्षण घेवून आलेल्या पाच लोकांव्यतिरिक्त कोणीच कामाला येत नव्हते. खरे हे पाच जण टवाळकीचा विषय झाले होते. परंतु हळुहळु जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व गावकऱ्यांना पटू लागले. पाहता पाहता संपूर्ण गाव जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करू लागले. कृष्णापूरच्या या कामाची दखल घेत थेट आमीर गावात आला आणि गावातील चिरेबंदी वाड्याने त्याला भूरळ पाडली. आमीर खान गावात येऊन गेला. साधेपणाने राहून गेला, याची गावकऱ्यांत सध्या चर्चा सुरू आहे. किरणला भावली पुडाची भाजी अभिनेता आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांना कृष्णापूर येथील पुडाची भाजी चांगलीच भावली. येथील नलावडे परिवाराच्या आग्रहास्तव आमीर आणि किरण यांनी आशीष नलावडे यांच्याकडे भाकर व पुडाची भाजीचा (बेसनाचा एक प्रकार) आस्वाद घेतला. किरणला पुडाची भाजी एवढी आवडली की तिने वर्षा नलावडे यांच्याकडून भाजी बनविण्याची रेसिपी विचारली. तसेच ती लिहूनही घेतली.