शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बालकांना मिळणार आधारकार्ड

By admin | Updated: February 13, 2015 01:53 IST

जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालक व त्यांच्या माता यांना आधारकार्ड व यूआयडी नंबर देण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनाने जुलै २०१२

यवतमाळ : जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालक व त्यांच्या माता यांना आधारकार्ड व यूआयडी नंबर देण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनाने जुलै २०१२ मध्येच आदेश दिले होते. मात्र त्यावेळी ही प्रक्रियाच राबविण्यात आली नाही. आता एकात्मिक बालविकास विभागाने आधारकार्डासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे बालविकास अधिकारी आणि महिला बालकल्याण अधिकारी यांची मोठी तारांबळ उडत आहे. जिल्ह्यात दोन हजार ६८१ अंगणवाड्या आहेत. ० ते ६ वयोगटातील दोन लाख २७ हजार ४०१ बालक असल्याची नोंद महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. गरोदर मातांची संख्या १५ हजार ६३४ आणि स्तनदा मातांची संख्या २० हजार २८ इतकी आहे. या बालकांचा सर्वेक्षण करून सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातील मुख्य सेविकांनी आधारकार्ड नसलेल्या बालकांची यादी तयार करावयाची आहे. १ व ६ मार्च या कालावधीत बीटस्तरावर आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे, याची सूचना पालकांना देऊन त्या सर्वांना मुलांसह नोंदणीसाठी बोलविण्याची जबाबदारी मुख्य सेविकांवर सोपविली आहे. आधारकार्ड नोंदणी केल्यानंतर तयार यादीतील किती मुले गैरहजर होती याचा शोध घेण्याचे काम १५ ते २० मार्च या पाच दिवसांमध्ये करावयाचे आहे. अंगणवाडी केंद्रात नोंदणी झालेल्या सर्व बालकांना आधारकार्ड मिळतीलच, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी विशेष अध्यादेश काढला असून, तो राबविण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)यवतमाळ : जिल्ह्यातील ० ते ६ वयोगटातील बालक व त्यांच्या माता यांना आधारकार्ड व यूआयडी नंबर देण्यात येत आहे. याबाबत केंद्र शासनाने जुलै २०१२ मध्येच आदेश दिले होते. मात्र त्यावेळी ही प्रक्रियाच राबविण्यात आली नाही. आता एकात्मिक बालविकास विभागाने आधारकार्डासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे बालविकास अधिकारी आणि महिला बालकल्याण अधिकारी यांची मोठी तारांबळ उडत आहे. जिल्ह्यात दोन हजार ६८१ अंगणवाड्या आहेत. ० ते ६ वयोगटातील दोन लाख २७ हजार ४०१ बालक असल्याची नोंद महिला व बालकल्याण विभागाने घेतली आहे. गरोदर मातांची संख्या १५ हजार ६३४ आणि स्तनदा मातांची संख्या २० हजार २८ इतकी आहे. या बालकांचा सर्वेक्षण करून सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आणि प्रत्येक अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातील मुख्य सेविकांनी आधारकार्ड नसलेल्या बालकांची यादी तयार करावयाची आहे. १ व ६ मार्च या कालावधीत बीटस्तरावर आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे, याची सूचना पालकांना देऊन त्या सर्वांना मुलांसह नोंदणीसाठी बोलविण्याची जबाबदारी मुख्य सेविकांवर सोपविली आहे. आधारकार्ड नोंदणी केल्यानंतर तयार यादीतील किती मुले गैरहजर होती याचा शोध घेण्याचे काम १५ ते २० मार्च या पाच दिवसांमध्ये करावयाचे आहे. अंगणवाडी केंद्रात नोंदणी झालेल्या सर्व बालकांना आधारकार्ड मिळतीलच, अशी व्यवस्था जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार यांनी विशेष अध्यादेश काढला असून, तो राबविण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)मानव निर्देशांकात माघरलेला जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. येथे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. आजही जिल्ह्यात कुपोषणग्रस्त बालके आढळतात. अशाही स्थितीत जिल्ह्यातील १६ पैकी १३ बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. कोट्यवधी रुपयांच्या पोषणआहाराची योजना राबविण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.