शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

धाराशिव येथील विद्यार्थिनीची यवतमाळच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये आत्महत्या 

By सुरेंद्र राऊत | Updated: December 29, 2023 16:37 IST

मध्यरात्रीची घटना, जेवणाचा डबा उशिरापर्यंत खोलीबाहेर असल्याने आला संशय 

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी  मध्यरात्री उघडकीस आली. वसतिगृहात राहणाऱ्या इतर विद्यार्थिनींमुळे हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांना पाचारण करून पंख्याला लटकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सुहानी सहदेव ढोले (१९) रा. धाराशिव असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सुहानी हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन जेमतेम तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. ती तिच्या मैत्रिणीसोबत रुळली होती. गुरुवारी रात्री तिने ओढणीने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास बांधला व त्याला लटकून आत्महत्या केली. सुहानीच्या खोलीबाहेर रात्रीचा डबा उशिरापर्यंत तसाच ठेऊन होता. यावरून इतर मुलींनी तिला उठविण्यासाठी दार ठोठावले, प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावून बघितले असता धक्कादायक प्रकार पुढे आला.याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक गुजर यांना देण्यात आली. डॉ. गुजर यांनी रात्रीच वसतिगृह गाठले. यवतमाळ शहर पोलिसांनाही घटनेची माहिती दिल्यानंतर शहर पोलिसांचे पथक तत्काळ पोहोचले. पंचासमक्ष सुहानीचा मृतदेह खाली काढण्यात आला. यावेळी सुहानीने लिहिलेली चार लाईनची सुसाईडनोट आढळून आली. त्यामध्ये मृत्यूला कुणीही जबाबदार नसल्याचे नमूद करीत त्याखाली सुहानीने स्वाक्षरी केली होती. हे सर्व साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुहानीचे वडील व मामा तातडीने यवतमाळात पोहोचले. मुलीला भेटण्यासाठी त्यांना थेट शवागृहातच जावे लागले. मुलीचा मृतदेह पाहून दोघांनीही हंबरडा फोडला. या प्रकरणात शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीष जतकर यांनी सुहानीच्या वडिलांची भेट घेतली व त्यांची सांत्वना केली. वैद्यकीय महाविद्यालयात या घटनेने खळबळ उडाली आहे. सुहानीने हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न कायम आहे. त्याचा शोध घेणार असल्याचे ठाणेदार सतीश चवरे यांनी सांगितले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ