शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्रा कार्यकारी अभियंत्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल, यवतमाळ मुख्याधिकाऱ्यांची तक्रार

By सुरेंद्र राऊत | Updated: January 14, 2023 22:01 IST

Yavatmal : मजीप्राचे कार्यकारी अभियंता यांच्यासह पाचजणाविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

- सुरेंद्र राऊत

यवतमाळ - शहरातील रस्त्याचे खोदकाम करताना रितसर नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी कुठलीही परवानगी न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाईपचे लिकेज काढण्यासाठी शनिवारी दुपारी खोदकाम सुरू केले. हा प्रकार नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी थेट कठोर कारवाई केली. या संदर्भात मजीप्राचे कार्यकारी अभियंता यांच्यासह पाचजणाविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे, कर्मचारी रामाजी खोब्रागडे, कंत्राटदार नालमवार, विनोद दत्ताजी कांबळे, जेसीबी चालक प्रफुल दुर्वास पाटील या पाचजणाविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम ३ भारतीय दंडसंहिता कलम ४२७ आणि सहकलम ३४ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. याची तक्रार मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यातर्फे साजीद वजीर शेख यांनी यवतमाळ शहर पोलिसात दिली. शहरासाठी अमृत याेजनेतून वाढीव पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम करण्यात आले. यात संपूर्ण शहरातील रस्त्यावर खाेदकाम झाले. सलग चार वर्षांपासून या खाेदकामुळे यवतमाळकर जनता त्रस्त झाली आहे. मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. नवीन पाइपलाइन ठिकठिकाणी लिक हाेत आहे. 

जीवन प्राधिकरणाच्या निकृष्ट कामाचा फटका सर्वांनाच बसत आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असे सांगण्यात आल्यानंतर नगरपरिषदेने रस्त्याची दुरुस्ती केली. अनेक रस्ते नव्याने तयार करण्यात आले आहेत. आता या रस्त्यावर लिकेज काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाची यंत्रणा काम करत आहे. यासाठी नगरपरिषदेची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय खाेदकामात क्षतिग्रस्त झालेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी त्याचे पैसे नगरपरिषदेकडे जमा करावे लागतात. अशी काेणतीच प्रक्रिया जीवन प्राधिकरणकडून हाेताना दिसत नाही. 

मेडिकल चाैक ते नंदूरकर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्राधिकरणाची यंत्रणा लिकेज काढण्यासाठी खाेदकाम करत हाेती. शनिवारी दुपारी हा प्रकार तेथून जाताना मुख्याधिकारी दादाराव डाेल्हारकर यांना दिसला. काेणतीच परवानगी न घेता, हे काम सुरू असल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ खाेदकामाचा पंचनामा करून जेसीबी जप्त केला. यापूर्वी सुध्दा जीवन प्राधिकरणाने धामणगाव मार्गावर, चांदणी चाैक परिसर, दर्डानगर भागात नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर खाेदकाम केले आहे. 

जीवन प्राधिकरणाने खाेदकाम करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. मनमानी पद्धतीने चांगल्या रस्त्यावर खोदकाम करणे नियमानुसार नाही. पालिका रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा व रस्त्याची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करीत असताना प्राधिकरणाच्या यंत्रणेनेही जबाबदारी राखणे अपेक्षित आहे.- दादाराव डाेल्हारकर मुख्याधिकारी यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ