शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

९६ टक्के ‘गुरूजी’ परीक्षेत नापास!, टीईटीचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 05:38 IST

वणी (यवतमाळ) : शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाºया ९६ टक्के शिक्षकांना टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. केवळ तीन ते चार टक्के डीएड, बीएडधारक शिक्षक होण्यास पात्र ठरले आहेत.

विनोद ताजने वणी (यवतमाळ) : शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाºया ९६ टक्के शिक्षकांना टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होता आले नाही. केवळ तीन ते चार टक्के डीएड, बीएडधारक शिक्षक होण्यास पात्र ठरले आहेत.शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणा-या डीएड, बीएड उमेदवारांमधून शिक्षकांची निवड करण्याची अट आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २२ जुलै २०१७ ला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली. सोमवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.या परीक्षेसाठी पहिली ते पाचवीकरिता मराठी माध्यमाचे एक लाख ४२ हजार ५१ परीक्षार्थी, इंग्रजी माध्यमाचे पाच हजार १५२ व उर्दू माध्यमाचे ११ हजार ४७ असे एक लाख ५८ हजार २५० परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ सहा हजार ७६३ परीक्षार्थी शिक्षक बनण्यास पात्र ठरले.अर्थात तब्बल ९५.७३ टक्के परीक्षार्थी या परीक्षेत अपात्र ठरले आहेत. तसेच सहावी ते आठवीसाठी मराठी माध्यमातून एक लाख आठ हजार ९७२, इंग्रजी माध्यमासाठी पाच हजार १७८ आणि उर्दू माध्यमासाठी चार हजार ४०२ असे एक लाख १८ हजार ५६१ परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ दोन हजार ७३२ (२.३०%) परीक्षार्थी शिक्षक बनण्यास पात्र ठरले आहे.