शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथील बँकेतून ग्राहकाचे ९५ हजार उडविले

By admin | Updated: July 15, 2016 02:36 IST

आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून पैैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाचे ९५ हजार रूपये लंपास केल्याची घटना...

बँक आॅफ महाराष्ट्र : आयकर अधिकारी असल्याची बतावणी पांढरकवडा : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून पैैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकाचे ९५ हजार रूपये लंपास केल्याची घटना गुरूवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास येथील महाराष्ट्र बँकेत घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील मुख्य मार्गावर बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा आहे. व्यापारी दिलीप किसनचंद बजाज यांनी नोकर सुमित जयंत राखुंडे याला महाराष्ट्र बँकेत पैसे जमा करण्यासाठी एक लाख ८७ हजार रूपये दिले. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी महाराष्ट्र बँकेत पैसे भरण्यासाठी गेला. बजाज यांची आयडीया मोबाईल नेटवर्क एजंसी असून ते दररोज महाराष्ट्र बँकेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे जमा करतात. बँकेत आधीच हजर असलेला एक भामटा सुमितजवळ आला. ‘मी आयकर विभागाचा अधिकारी असून मला तुमची बॅग तपासायची आहे’, असे म्हणून त्याने ती बॅग सुमितजवळून घेतली. पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात नकली नोटा आल्या असल्याने बॅगेतील नोटा तपासायच्या आहेत, असेही तो म्हणाला. पैशाची बॅग उघडताच क्षणाचाही विलंब न करता त्या भामट्याने हजार व पाचशेच्या नोटांचे बंडल, असे ९५ हजार रूपये बॅगेतून उचलले व बँकेतून पोबारा केला. बँकेच्या बाहेरच दुचाकी घेऊन उभा असलेल्या त्याच्या सहकाऱ्याच्या दुचाकीवरून बसून तो पसार झाला. सुमितने आरडाओरड करताच बँकेच्या परिसरात बरीच गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष माने ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात भामट्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)