शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

९३५ कोटी थकबाकीतून केवळ पाच कोटी वसूल

By admin | Updated: January 23, 2017 00:59 IST

नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे.

जिल्हा बँक चिंतेत : नोटाबंदी, दुष्काळी स्थिती कारणीभूत यवतमाळ : नोटाबंदी, सततचा दुष्काळ आणि शेतमालाचे पडलेले भाव यामुळे जिल्हा बँकेची कर्ज वसुली ठप्प झाली आहे. थकीत आणि चालू असे ९३५ कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत असताना आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. यामुळे जिल्हा बँक चिंतेत पडली असून वसुली कशी करावी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीयकृत बँकांच्या दुप्पटीने शेतकऱ्यांंना कर्जाचे वितरण केले जाते. दरवर्षी या बँकेची वसुली समाधानकारक असते. परंतु यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटाबंदी निर्णयाने जिल्हा बँक अडचणीत आली. या बँकेला नोटाबंदीत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलवून देण्यास बंदी होती, ती आजही कायम आहे. तसेच नवीन नोटाही या बँकेला महिनाभरानंतर मिळाल्या. त्यामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. गतवर्षी जिल्हा बँकेने ४३५ कोटी रुपयांच्या खरीप पीक कर्जाचे वाटप केले होते. तर ५३४ कोटी रुपये आतापर्यंतचे थकीत आहे. दोनही मिळून हा आकडा ९३५ कोटींवर जाऊन पोहोचला. खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीची आशा होती. परंतु बाजारात शेतमालाचे भाव गडगडले. परिणामी जिल्हा बँकेला वसुली करणे कठीण झाले आहे. दुसरीकडे उत्तम पीक परिस्थिती दर्शविल्याने आणेवारीही अधिक आली. त्यामुळे बँकांचा कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे पैसेच नाही. त्यामुळे नोटीस आल्यानंतरही कर्जाची परतफेड करताच आली नाही. आतापर्यंत केवळ पाच कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी चार कोटी ६४ लाख रुपयांची तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांनी ५९ लाख रुपयांची परतफेड केली आहे. थकीत कर्जाच्या तुलनेत अर्धाटक्काही वसुली झाली नाही. त्यामुळे आता जिल्हा बँकेचे अधिकारी चिंतेत सापडले आहे. वसुलीसाठी पथकांची नेमणूक केली आहे. परंतु नोटाबंदीमुळे आजही ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत झाले नसल्याने नोटाबंदीचे कारण दिले जाते. (शहर वार्ताहर)