शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

५२ ग्रामपंचायतीत ९७० उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 17, 2015 02:36 IST

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ...

उमरखेड तालुका : चार ग्रामपंचायती अविरोध, अनेक गावात रंगतदार लढतीअविनाश खंदारे उमरखेडतालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ५२ ग्रामपंचायतींसाठी ९७० उमेदवार रिंगणात आहे. अनेक ग्रामपंचायतीत कडवा संघर्ष होण्याची चिन्हे आहे.उमरखेड तालुक्यातील ५६ गावात निवडणुका घोषित झाल्या होत्या. ५६ ग्रामपंचायतींसाठी १२२१ उमेदवारांनी नामांकन भरले होते. त्यातील २५१ जणांनी माघार घेतली. तर नागापूर, चिंचोली, आमडापूर, परजना ही चार गावे अविरोध झाली आहे. आता ५२ ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात सुकळी न., कुपटी, बोथा वन, धनज, कळमुला, तिवरंग, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस बु., उंचवडद, डोंगरगाव, सोईट घ., सोनदाबी, खरूस खु., टेंभुरदरा, हातला, दिवट पिंपरी, पोफाळी, पार्डी बंगला, चिंचोली संगम, तिवडी, बिटरगाव खु., लिंबगव्हाण, वरुड बिबी, चुरमुरा, वाणेगाव, दहागाव, मन्याळी, बाळदी, कृष्णापूर, कारखेड, लोहरा खु., देवसरी, दिंडाळा, ढाणकी, मेट, गाजेगाव, निगनूर, टाकळी इजारा, कोपरा बु., पिंपळगाव, चिखली, अकोली, भवानी, सावळेश्वर, करंजी, बोरगाव, दराटी आदी गावांचा समावेश आहे.अनेक गावातील उमेदवार हे गावातील समस्या घेऊन रिंगणात उभे ठाकले आहे. निवडणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पोफाळी येथे अतिशय चुरशीची निवडणूक होत असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण व विद्यमान महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वच पक्षाचे लोक एकत्र येवून पॅनल तयार केले आहे. तर त्यांच्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव तालनकर यांच्या नेतृत्वात पॅनल उभे केले आहे. विडूळ गावात उमरखेड पंचायत समितीच्या सभापती प्रयागबाई कोत्तेवार, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे यांच्या नेतृत्वातील पॅनल उभे आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी मिळून भगवान धोपटे, अनिल देशमुख, मिलिंद धुळे, बापुराव धुळे यांनी लढत देण्याची तयारी चालविली आहे.पाणीटंचाईच्या गावात निवडणूक जोमातपोफाळी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने उमरखेड तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येकजण निवडणुकीसाठी सज्ज आहे. अशा स्थितीत पावसाची दडी आणि पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र गावकऱ्यांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. पाणीटंचाई असलेल्या गावात निवडणुकीने जोर मात्र चांगलाच धरला आहे. उमरखेड तालुक्यातील कळमुला गावातील नळयोजना कित्येक दिवसांपासून बंद आहे. नागरिक आपली तहान कशीबशी भागवत आहे. पोफाळीजवळच्या वसंतनगर येथेही अशीच अवस्था आहे. बाराही महिने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पाणीटंचाईचा प्रश्न मात्र दुर्लक्षिला जात आहे.