तांडा-वस्त्यांची निवड : तालुक्यासाठी लोकसंख्येचा निकषयवतमाळ : समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती सुधार योजनेवरून नेहमीच राजकीय वादंग उठते. यावर उपया म्हणून पहिल्यांदा लोकसंख्येच्या आधारवर तालुक्यांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात बंजारा तांडा आणि विजाभज वस्त्यांवर आठ कोटी ७२ लाखांची कामे केली जाणार आहे. बंजारा तांडा आणि विजाभज (विमुक्त जाती भटक्या जमाती) वस्त्यांमध्ये विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी जिल्हास्तावर विशेष समिती तयार करण्यात आली आहे. तांडावस्ती सुधार योजनेची समिती पूर्वी पुर्णत: राजकीय प्रभावाखाली राहत होती. सत्ताधारी पक्षातील सदस्यांना या समितीवर अध्यक्ष नियुक्त होत होते. हा राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आता पुन्हा तांडावस्ती सुधार समितीचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नियुक्त केले आहे. सीईओ दिपककुमार सिंगला यांनी प्रथमच तांडावस्ती योजनेसाठी गावा प्रमाणेच तालुकानिहाय सुध्दा लोकसंख्येचा निकष लावला आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप करण्यास कोणताच वाव उरला नाही. ज्या गावात बंजारा अथवा विजाभज वस्त्या असतील तिथेच या योजनेतून कामे केली जाणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षासात १ हजार ५२ विजाभज वस्त्यामध्ये काम केले जाणार आहे. त्यात पुसद तालुक्यातील १७० वस्त्याचा सर्वाधिक समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा १४२ आणि केळापूर तालुक्यातील १२२ वस्त्या आहेत. बंजारा तांड्यावर ४ कोटी ३६ लाखांची विकास कामे होणार आहेत. त्याचा १६१० तांड्यांवरच्या ३ लाख ५१ हजार ८१ बंजारा समाज बांधवाणा लाभ मिळणार आहे. आर्णी तालुक्यातील सर्वाधिक ३१९ तांडे, पुसद ३११, दारव्हा २४३ आणि महागाव तालुक्यातील २४२ तांड्याचा समावेश आहे. यातून प्रामुख्याने रस्ते, नाल्या, पुर संरक्षक भिंत यासारखी कामे केली जाणार आहे. त्याचे प्रारूप तयार झाले असून सीईओंच्या मान्यते नंतर कामांचे वितरण केले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जिल्ह्यात तांडावस्तीत नऊ कोटींची कामे
By admin | Updated: September 25, 2016 02:53 IST