शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसचे ९५२ घरकूल पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:57 IST

नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न

प्रकाश सातघरे।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : नांदगव्हाण धरण फुटल्याने शहरातून वाहणाऱ्या धावंडा नदीला आलेल्या महापूरात उद्ध्वस्त कुटुंबाच्या पूनर्वसनाचा प्रश्न आजही कायम आहे. १३ वर्ष झाले तरी पूरग्रस्ताना हक्काच्या घरात जाता आले नाही. आता ९५२ घरकुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला असून ९ जुलै रोजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.दिग्रस शहराला पाणी पुरवठा करणारे नांदगव्हाण धरण ९ जुलै २००५ रोजी फुटले. यामुळे आलेल्या महापूरात १३ जणांना जलसमाधी मिळाली. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. पुराचे पाणी हजारो घरात शिरल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली. धावंडा नदी तीरावरील कुटुंबांच्या पूनर्वसनाचा प्रश्न आला.शासकीय सर्वेक्षणानुसार ९५२ कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यांच्या पूनर्वसनासाठी मंजुरी मिळाली. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ९५२ घरकुलाच्या बांधकामाचा ठेका देण्यात आला. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु आता १३ वर्ष पूर्ण झाले तरी घरकुलाचा प्रश्न कायम आहे. येत्या ९ जुलै रोजी या महापूराच्या घटनेच्या आठवणी ताज्या होणार असून त्याच दिवशी घरकुलांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त गजानन हाडके हा युवक आंदोलन करणार आहे. सदर घरकूल सुस्थितीत आणि दर्जेदार बांधकाम करून मिळण्यासाठी गजानन हाडके गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यापासून मंत्र्यांपर्यंत पाठपुरवा केला. परंतु परिणाम शून्य निघाला. ९५२ घरकुलांपैकी ४०० घरकुल तयार होऊन अंतिम टप्प्यात आहे. जनतेच्या कोट्यवधी रुपयाची माती करणाऱ्या कंत्राटदाराला दरदिवशी ५०० रुपये दंड ठोठावण्यावर गांभीर्याने विचार सुरू आहे.राजकीय उदासीनतादिग्रसमध्ये महापूर आल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांचे सांत्वन केले. त्यात राज्यस्तरीय आणि स्थानिक नेत्यांचा समावेश होता. लवकरात लवकर पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता १३ वर्ष झाले तरी घरकुल मिळाले नाही. याला राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप पूरग्रस्त करीत आहे.