शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘मेडिकल’च्या ८५ बदली कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:57 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळून राज्यातील ६२९ कर्मचाऱ्यांना मिळाला. अन्यायाविरुद्ध यवतमाळातील कर्मचाºयांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देयवतमाळवरच अन्याय का? : राज्यातील १३ रुग्णालयातील ६२९ कर्मचारी नियमित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १९९६ पासून बदली कर्मचारी कार्यरत होते. अस्थायी स्वरूपात असलेल्या या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने डिसेंबर २०१५ मध्ये नियमित करण्याचा आदेश काढला. याचा लाभ यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी वगळून राज्यातील ६२९ कर्मचाऱ्यांना मिळाला. अन्यायाविरुद्ध यवतमाळातील कर्मचाºयांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.यवतमाळ मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता यांनी डीएमईआरकडे चुकीचा अहवाल सादर केला. सलग २४० दिवसांची सेवा भरत नसतानाही इतर महाविद्यालयात लाभ देण्यात आला. येथील अधिष्ठातांच्या चुकीमुळे कर्मचाºयांवर मोठा अन्याय झाला आहे. महाविद्यालयाचा बॅकबोन म्हणून अस्थायी चतुर्थ श्रेणी कर्मचारी ओळखल्या जातो. यवतमाळातील ८५ कर्मचारी एकाच वेळी संपावर गेले आहेत. या कर्मचाºयांपैकी २५ जणांना अपात्र ठरवून सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश डीएमईआरने दिले. सेवेत नियमित करण्याऐवजी बडतर्फ करण्याचा अन्यायकारक आदेश धडकल्याने हे कर्मचारी हादरले आहे. मुळात यवतमाळच्या अस्थायी कर्मचाºयांनीच नियमित करण्यासाठी लढा उभारला होता. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. मात्र याचा लाभ त्यांना मिळाला नाही. डीएमईआरने सुधारित अहवाल मागवून सेवेत नियमित करावे, अशी मागणी या कर्मचाºयांची आहे. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.