शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

८४ हजार हेक्टर पीक धोक्यात

By admin | Updated: July 1, 2015 00:20 IST

मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत.

पावसाची दडी : शेतकऱ्यांच्या नशिबी यंदाही अवर्षणाचा सामना पुसद : मृगनक्षत्राच्या शेवटच्या चरणात बरसलेल्या पावसाने हुरळलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसासाठी आकाशाकडे लागल्या आहेत. गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आणि उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पुसद कृषी उपविभागातील चार तालुक्यातील ८४ हजार हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात आले आहे. गत तीन वर्षांपासून पुसद उपविभागात शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशा स्थितीत यंदा मृगनक्षत्रात शेवटच्या चरणात दमदार पाऊस झाला. हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. पुसद कृषी उपविभागात ८४ हजार ३८७ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. त्यात पुसद तालुक्यात २३ हजार ९१७, दिग्रस १७ हजार ४५०, उमरखेड २६ हजार ८३०, महागाव १६ हजार १८१ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. दमदार पावसाने बियाणे अंकुरले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कधी नव्हे ते समाधान दिसू लागले. मात्र अवघ्या आठ दिवसातच निसर्गाने आपला रंग दाखविणे सुरू केले. उपविभागात आठ दिवसात कुठेही पावसाची साधी सर कोसळली नाही. आज बरसेल, उद्या बरसेल या आशेवर शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र दररोज आकाश निरभ्र दिसते. उन्हाळ्यासारखी उन्ह तपत आहे. त्यामुळे जमिनीतून अंकुरलेले बियाणे कोमेजून जात आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ओलिताचा प्रयत्न चालविला आहे. परंतु वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. येत्या दोन दिवसात पाऊस झाला नाही तर सोयाबीन उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. कपाशी आणखी चार-पाच दिवस तग धरु शकते. यासोबतच उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांचीही स्थिती गंभीर झाली आहे. पाऊस कोसळला नाही तर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. (लोकमत वृत्तसेवा) उमरखेड तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरउमरखेड : गत आठ दिवसांपासून पावसाची एकही सर कोसळली नसल्याने उमरखेड तालुक्यातील पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. उमरखेड तालुक्यात आतापर्यंत १५४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा कितीतरी पाऊस या भागात झाला. गत वर्षी या तारखेला ५२७ मिमी पाऊस कोसळला होता. आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस आला नाही तर पिकांचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. तालुक्यातील पेरणी जवळपास आटोपली आहे. परंतु पाऊस नसल्याने पिके करपत आहे.