शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

८२४ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

जीवन प्राधिकरणाने अवैध स्टँडपोज बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांकडे क्षमतेपेक्षा अधिक बिल थकले,

जीवन प्राधिकरणाची कारवाई : अवैध स्टँडपोस्ट बंदचे नगरपरिषदेला पत्रयवतमाळ : जीवन प्राधिकरणाने अवैध स्टँडपोज बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासोबतच ज्या ग्राहकांकडे क्षमतेपेक्षा अधिक बिल थकले, अशा ८२४ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापले आहे. जीवन प्राधिकरणाने हाती घेतलेल्या मोहिमेने पाण्याची चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.उन्हाच्या वाढत्या प्रकोपासोबत पाणीटंचाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. या स्थितीत अनेक भागात पाणी चोेरीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारावर अंकुश बसावा म्हणून प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यवतमाळ शहरात पाच प्रकरणात पोलिसात अशी तक्रार नोंदविण्यात आली आहे. यामध्ये पाटीपुरा परिसरातील अवैध स्टँडपोज, अंबिकानगर, सेवानगर आणि माळीपुरा परिसरात पाईपलाईन फोडून परस्पर कनेक्शन घेण्याचा प्रकार झाला. या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. जीवन प्राधिकरणाचा ११ कोटींचा पाणी कर थकला आहे. नळाचे बिल न भरणाऱ्या नागरिकांना नळ कनेक्शन कापण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. क्षमतेपेक्षा अधिक बिल असल्याने अनेकांना बिल भरता आले नाही. यवतमाळ शहरात अशा ८२४ ग्राहकांवर नळ कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली.यामध्ये २५ हजारापेक्षा कमी नळाच्या पाणी बिलाची थकबाकी असणाऱ्या ५९३ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. २५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत पाणी बिलाची थकबाकी असणारे १५६ ग्राहक आहेत. ५० हजारांपासून एक लाखापर्यंत थकबाकी असणारे ४८ ग्राहक, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असणाऱ्या २७ ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्यात आले. शासकीय कार्यालयांकडेही पाणी बिलाची मोठी रक्कम थकीत आहे. यासाठीही प्रयत्नाची गरज आहे. (शहर वार्ताहर)