शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात आठ हजार नागरिकांना श्वानदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:15 IST

जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देप्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणार अ‍ॅन्टी रॅबीज लस : पावसाळ्यात प्रमाण वाढण्याची चिन्हे

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हाभरात श्वानांची वाढती संख्या नागरिकांसाठी काळ ठरू पाहात आहे. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील वर्षभरात आठ हजार जणांना श्वानदंश झाल्याची गंभीर नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.यवतमाळ जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. जिल्हाभरात श्वानाची संख्या खूप आहे. श्वान विविध कारणांमुळे दिवसेंदिवस हिंसक होत आहे. स्वजातीतील वर्चस्वाच्या लढाईतून श्वानामधील हल्ले वाढत आहेत. जखमी झालेल्या श्वानावर उपचार मात्र होत नाही. उपचाराअभावी जखम चिघळते. यातून श्वान पिसाळण्याची संख्या वाढते. यामुळे श्वानदंशाची संख्या वाढली आहे.अशा श्वानावर उपचार करणारे पशु वैद्यकीय डॉक्टर गावात फिरताना दिसत नाही. उपचाराअभावी श्वान गावभर सैरभैर होतो. तो वाटेत येईल त्याला चावतो. श्वान चावल्याची जखम अधिक धोकादायक आहे. त्याचे जंतू थेट मानवी शरीरात शिरतात. यावर वेळीच उपचार न झाल्यास श्वानदंश झालेला व्यक्ती प्राण्याप्रमाणेच विव्हळतो. यात त्याच्या मृत्यूची संभावना अधिक असते. असे असले तरी श्वानाची काळजी घेतली जात नाही. यातून जिल्ह्यात श्वान चावण्याचे प्रकार वाढले आहे. याला नियंत्रित करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अ‍ॅन्टी रॅबीजची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अशा घटना घडल्यास गावपातळीवर उपचार शक्य होणार आहे.जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढलेयवतमाळचा भूभाग जंगलाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यानंतर या ठिकाणी सर्वत्र हिरवळ पहायला मिळते. या हिरवळीत सापांचा मुक्तसंचार पहायाला मिळतो. यातूनच ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षभरात ३२३ सर्पदंशाची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. यावर मात करणारे अ‍ॅन्टी स्नेक व्हेनम औषधाची ट्रिटमेंट त्यावर केली जाते. या प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांना पाठविले जाते. यामुळे सर्पदंशनानंतरही रूग्णाचे प्राण वाचले आहेत.सुधारित इंजेक्शनपूर्वी अ‍ॅन्टी रॅबीज लस पोटात बेंबीच्या बाजूला दिली जात होती. आता यात बदल झाले आहे. सुधारित लसचे इंजेक्शन हातात दिले जाते. ०, ३, ७, १४ आणि २८ दिवसानंतर ही लस दिली जाते. त्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी उपाययोजना केल्या आहेत.