शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

८० वर्षांच्या वृद्धांची न्यायासाठी पायपीट

By admin | Updated: June 23, 2017 01:50 IST

निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही

शिक्षण विभागात अनास्था : न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळेना निवडश्रेणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवृत्त होऊन २५ वर्षे लोटली, तरी शेकडो शिक्षकांचा संघर्ष काही संपला नाही. ८० वर्षांपलीकडे वय गेलेले असतानाही त्यांना पायपीट करावी लागतेय. न्यायालयात जाऊन आदेश मिळविला तरी जिल्हा परिषदेतून अंमलबजावणीचा थांगपत्ता नाही. सेवानिवृत्त शिक्षकांच्या निवडश्रेणीचा प्रश्न अखेर बुधवारी शिक्षण समितीच्या सभेत उपस्थित झाला, तेव्हाही अधिकाऱ्यांनी सहकार्याऐवजी ‘बघूया, करूया’ अशी उपरी भूमिका घेतल्याने या वयोवृद्धांच्या संयमाचा बांध फुटला.आयुष्यभर खेड्यापाड्यांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा निवृत्तीचा काळ समाधानी असणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतरही विविध लाभ मिळविण्यासाठी वयोवृद्ध शिक्षकांना जिल्हा परिषदेपासून न्यायालयापर्यंत वारंवार पायपिट करावी लागत आहे. नियमानुसार, आपल्याला निवडश्रेणीचा लाभ मिळावा, ही या शिक्षकांची मागणी आहे. कुणी २५ वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहे, तर कुणाच्या निवृत्तीला त्याहीपेक्षा अधिक काळ लोटला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात हेलपाटे मारता-मारता अनेकांच्या प्रकृतीची वासलात लागली. काही निवृत्तांनी तर जगाचा निरोप घेतला. अधिकाऱ्यांकडून सातत्याने टोलवाटोलवी झाल्यावर हे वयोवृद्ध शिक्षक संघटित झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. संबंधित शिक्षकांना निवडश्रेणीच्या यादीत समाविष्ट करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. निकाल येऊन तीन महिने झाले तरी यादी शिक्षकांना पाहायलासुद्धा मिळालेली नाही. अखेर वंचित शिक्षकांनी काँग्रेसच्या देऊरवाडी (ता. आर्णी) सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी बुधवारच्या शिक्षण समितीच्या सभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, आमच्याकडे जीआर नाही, आम्ही तो शासनाकडे मागविला आहे, याद्या तयार होत आहेत, कच्ची यादी आहे, ती पक्की झाल्यावर शिक्षकांच्या घरी पाठवून देण्यात येईल, असे उत्तर देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चा टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सभेत चर्चेसाठी हा मुद्दा १५ दिवसांपूर्वी देण्यात आला होता, तरीही ऐनवेळी मुद्दा आल्याचे सांगत चर्चा टाळली. सभेत चर्चाच होणार नसेल, तर केवळ चहापाण्यासाठी सभा घ्यायची का, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.