लोहाराची घटना : इंडिकाने धडक दिल्यानंतर आॅटोरिक्षावर बस आदळलीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडी बाजार करून गावी निघालेल्या मजुरांच्या आॅटोरिक्षाला इंडिकाने धडक दिल्यानंतर त्यावर एसटी बस येऊन आदळली. येथील लोहाराजवळ झालेल्या विचित्र अपघातात एक महिला ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मजुरांनी केलेला बाजार रस्त्यावर विखुरला होता.दुर्गाबाई रामभाऊ राऊत (६०) रा. भोयर असे मृत महिलेचे नाव आहे. तर गजानन भारत राऊत (२०), सुंदर देवराव मांगुळकर (५०), विशाल डुकरे (३५), रंजना महादेव सक्रापूर (३०), शिवाणी चतूर निशाद (१३), अविनाश निशाद, विशाल धुर्वे (३०) सर्व रा. भोयर आणि आॅटोरिक्षा चालक शेषराव शेंडे रा. लोहारा अशी जखमींची नावे आहे. यवतमाळचा आठवडी बाजार करून लोहारा येथील मजूर आॅटोरिक्षा क्र.एम.एच.२९-सी-८३८२ ने भोयरकडे जात होते. दरम्यान मारोती शो-रूमच्या बाजूच्या रस्त्याकडून भरधाव इंडिका आली. तिने या आॅटोरिक्षाला धडक दिली. त्याच दरम्यान यवतमाळकडून पुसदकडे जाणाऱ्या एसटी बसने (क्र.एम.एच-०६- एस-८९४१) धडक दिली. या विचित्र अपघातात आॅटोरिक्षाने तीन ते चार पलट्या खालल्या. सर्व प्रवासी बाहेर फेकल्या गेले. अपघातस्थळावर एकच हल्लकल्लोळ उडाला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेत सर्व जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी दुर्गाबाई राऊत यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
विचित्र अपघातात आॅटोरिक्षातील महिला ठार, आठ जखमी
By admin | Updated: June 5, 2017 01:16 IST