शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

७८५ सहकारी संस्था अवसायनात

By admin | Updated: May 1, 2016 02:23 IST

विविध कारणांनी डबघाईस आलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७८५ सहकारी संस्था अवसायनात निघाल्या असून त्यांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे.

सहकाराला ग्रहण : जिल्ह्यातील १८० सहकारी संस्थांचा ठावठिकाणा नाहीरूपेश उत्तरवार यवतमाळविविध कारणांनी डबघाईस आलेल्या जिल्ह्यातील तब्बल ७८५ सहकारी संस्था अवसायनात निघाल्या असून त्यांची नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे. यातील १८० संस्थांचा तर जिल्ह्यात कुठे ठावठिकाणाही आढळून आला नाही. सहकार विभागाच्या सर्वेक्षणातून ही गंभीर बाब पुढे आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात गावागावांत सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात आले. सेवा संस्था, सेवा सोसायटी, ग्रामविविध कार्यकारी सोसायटी, पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पाणी वापर संस्था यासह विविध सोसायट्यांची स्थापना करण्यात आली. सहकारातून विकासाचे स्वप्न पाहात जिल्ह्यात विविध ठिकाणी या संस्था स्थापन करण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात २३७२ सहकारी संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या आर्थिकस्थितीची पाहणी करण्यासाठी सहकार विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात धक्कादायक प्रकार उघडकीस आले. ५२६ सहकारी संस्था बंद आढळून आल्या. ८३ संस्थांचे कार्य स्थगित होते. तर १८० संस्थांचा शोधूनही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे या ७८५ सहकारी संस्था सहकार विभागाच्या निशाण्यावर आल्या. या संस्था अवसायनात काढण्यात आल्या असून लवकरच त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकाराच्या माध्यमातून आपली मोठी प्रगती साधली आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातही सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात आले. परंतु सेवा सहकारी संस्था म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण अशी समजूत झाली. या सोसायटीवर असलेल्या संचालकांनी आर्थिक गैरव्यवहाराला चालना दिली. त्यातून सोसायट्या डबघाईस आल्या. अनेक सोसायट्यांनी दिलेले कर्ज वसूल झाले नाही. आर्थिक संकटात आलेल्या या संस्था मोडकळीस आल्या. यानंतरही या संस्थांकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. पूर्वी सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून व्यवसाय केला जायचा. कापड केंद्र, कृषी सेवा केंद्र, कर्ज वितरण, दुग्ध व्यवसाय, मासेमारी, पाणी वाटप आदी कामे केली जायची. परंतु भ्रष्टाचाराने किडलेल्या या संस्था आता अखेरच्या घटका मोजत आहे. चालू स्थितीत असलेल्या १५८३ सोसायट्यांचीही स्थिती फारशी चांगली नाही. या सोसायट्यांनी विविध कारणांनी चर्चेत येत असतात. या सोसायट्यांना वाचविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्यासोबतच संचालक आणि सभासदांचेही प्रबोधन करण्याची गरज आहे. अन्यथा यवतमाळ जिल्ह्यातून सहकारी संस्था कायमच्या बाद होतील. याचा फटका शेतकरी आणि लघु उद्योगांना बसण्याची शक्यता आहे. बैद्यनाथन समितीनंतरही सेवा सोसायट्यांची स्थिती जैसे थेग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायट्या म्हणजे शेतकरी आणि बँकांमधील दुवा असतात. कर्ज वितरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र या सोसायट्या आर्थिक डबघाईस आल्या होत्या. त्यामुळे शासनाने बैद्यनाथन समितीची नियुक्ती केली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार सेवा सोसायट्यांना आर्थिक मदत करण्यात आली. परंतु यानंतरही जिल्ह्यातील बहुतांश सेवा सोसायट्यांची अवस्था जैसे थे आहे. अनेक सोसायट्यांना सचिव नसून एका-एका सचिवाकडे पाच-पाच सोसायट्यांचा कारभार आला आहे.